Rohit Sharma: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना अॅडलेडच्या मैदानावर रंगला आणि या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा आपल्या खेळीने सर्वांना थक्क केले. पहिल्या सामन्यात केवळ 8 धावांवर माघारी परतलेला रोहित, दुसऱ्या सामन्यात मात्र नव्या जोशात दिसला. त्याने दमदार सुरुवात करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलाच धो-धो हल्ला केला आणि वनडे कारकिर्दीतील 59 वे अर्धशतक झळकावले.
या खेळीदरम्यान रोहित शर्माने इतिहासात नोंद होईल असा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) एकदिवसीय सामन्यांत एकूण 150 षटकार ठोकत हा पराक्रम करणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे. आजवर कोणत्याही आशियाई फलंदाजाला हे साध्य करता आलेले नव्हते.
हेही वाचा:IND vs AUS 2nd ODI: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव! अॅडलेडमध्ये 17 वर्षांनंतर पहिल्यांदा पडली भारताची विकेट
अॅडलेडच्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली. गिल पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला, पण रोहित मात्र एका टोकाला ठाम उभा राहिला. त्याने सुरुवातीला संयम दाखवत काही चेंडू सोडले, मात्र एकदा गती पकडताच त्याने जबरदस्त फटकेबाजी सुरू केली. पुल शॉटवर दोन खणखणीत षटकार लगावत त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
SENA देशांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे आशियाई फलंदाज:
या यादीत रोहितने सर्वांना मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. केवळ इतकेच नव्हे, तर या सामन्यात पहिला चौकार मारताच रोहित शर्माने आणखी एक मोठा टप्पा गाठला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1000 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज म्हणून तो इतिहासात नोंदला गेला.
हेही वाचा:India Women World Cup 2025: सेमीफायनलमध्ये भारताची संधी टिकवण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध आज निर्णायक लढत
ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज:
-
रोहित शर्मा – 1000 धावा
-
विराट कोहली – 802 धावा
-
सचिन तेंडुलकर – 740 धावा
-
एमएस धोनी – 684 धावा
-
शिखर धवन – 517 धावा
या विक्रमानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा 'हिटमॅन' या टायटलला न्याय देताना दिसला आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध त्याचा आत्मविश्वास आणि स्ट्रोकप्ले पाहता, ही मालिका भारतासाठी निर्णायक ठरू शकते. क्रिकेट चाहत्यांसाठी ही खेळी म्हणजे एक पर्वणीच म्हणावी लागेल.