IND vs AUS 2nd ODI: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दुसरा एकदिवसीय पराभव पत्करावा करावा लागला. भारताने मालिकेचा पहिला सामना 7 विकेट्सने गमावला, तर दुसरा सामना फक्त 2 विकेट्सने गमावला. या पराभवानंतर, मालिकेत ऑस्ट्रेलिया भारतावर क्लीन स्वीप करण्याचा धोका निर्माण झाला आहे. मालिकेचा अंतिम सामना 25 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.
17 वर्षांनंतर अॅडलेडमध्ये पराभव
हा पराभव विशेष महत्त्वाचा आहे कारण 2008 नंतर अॅडलेडमध्ये भारताने पहिल्यांदाच हार अनुभवली आहे. तेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड ओव्हलवर 50 धावांनी पराभव पत्करला होता, त्यानंतर 5 एकदिवसीय सामने जिंकले गेले होते. या नव्या पराभवामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली विजयाची मालिका आता खंडित झाली आहे.
हेही वाचा - India Women World Cup 2025: सेमीफायनलमध्ये भारताची संधी टिकवण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध आज निर्णायक लढत
भारताची फलंदाजी आणि धावसंख्या
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर, भारत 50 षटकांत 9 गडी गमावून फक्त 264 धावा करू शकला. रोहित शर्माने 73 धावा केल्या, त्यात 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. श्रेयस अय्यरने 77 चेंडूत 61 धावा केल्या, तर अक्षर पटेलने 44 धावा केल्या. हर्षित राणा (24) आणि अर्शदीप सिंग (13) यांनी अंतिम क्षणी संघाला थोडी मदत केली.
हेही वाचा - 'रॅबडोमायोलिसिस' नावाच्या दुर्मिळ आजाराशी लढलो! तिलक वर्माचा मोठा खुलासा; काय आहे ही धोकादायक स्नायू दुखापत?
ऑस्ट्रेलियाचा सहज विजय
दरम्यान, 265 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडने सुरुवात चांगली केली, मात्र दोघेही लवकर बाद झाले. अर्शदीप सिंगने मार्शला 11 धावांवर बाद केले. तथापी, मॅथ्यू शॉर्टने 78 चेंडूत 74 धावा केल्या, तर कॉलिन कूपरने 49 चेंडूत 55 धावा केल्या. मिचेल ओवेनने 23 चेंडूत 36 धावा करून ऑस्ट्रेलियाला विजयाची खात्री दिली. या मालिकेत सलग पराभवानंतर भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली संघाला परदेशात सामंजस्य साधण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे.