Tuesday, November 18, 2025 09:34:45 PM

Shama Mohamed On Gautam Gambhir: 'सरफराज खान संघाबाहेर आहे कारण तो 'खान' आहे...'; शमा मोहम्मद यांचा गौतम गंभीरवर आरोप

शमा मोहम्मद यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले, 'सरफराज खान फक्त त्याच्या आडनावामुळे टीम इंडियामध्ये निवडला गेला नाही का? गौतम गंभीर याबद्दल काय विचार करतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे.'

shama mohamed on gautam gambhir सरफराज खान संघाबाहेर आहे कारण तो खान आहे शमा मोहम्मद यांचा गौतम गंभीरवर आरोप

Shama Mohamed On Gautam Gambhir: भारतीय क्रिकेटमुळे पुन्हा एकदा राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी सध्या टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर आरोप करत म्हटले आहे की, संघात खेळाडूंची निवड धर्माच्या आधारे केली जात आहे. शमा मोहम्मद यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले, 'सरफराज खान फक्त त्याच्या आडनावामुळे टीम इंडियामध्ये निवडला गेला नाही का? गौतम गंभीर याबद्दल काय विचार करतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे.' त्यांच्या या विधानामुळे क्रिकेटसह राजकीय वातावरण तापले आहे.

हेही वाचा - Niraj Chopra: ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा भारतीय लष्करात ‘सन्माननीय लेफ्टनंट कर्नल’; देशाचा अभिमान पुन्हा उंचावला

दरम्यान, सरफराज खानने 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शेवटचा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, इंग्लंड दौरा आणि अलिकडच्या वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. त्याचा प्रभावी देशांतर्गत रेकॉर्ड असूनही, सरफराज संघाबाहेर आहे. 

शमा मोहम्मद यांची एक्स पोस्ट - 

तथापी, शमा मोहम्मद यांची एखाद्या क्रिकेटपटूंबाबत वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीचं घटना नाही. यापूर्वी या वर्षाच्या सुरुवातीला तिने रोहित शर्माला 'जाड' म्हणत, भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात अकार्यक्षम कर्णधार असल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा - Asia Cup Trophy: आशिया कप ट्रॉफी वाद चिघळला! 'ट्रॉफी भारताला सुपूर्द करा, अन्यथा...'; BCCI चा मोहसिन नक्वींना ईमेल

सामाजिक माध्यमांवर आणि क्रिकेट वर्तुळात त्यांच्या या विधानावर मोठ्या प्रमाणात चर्चा आणि टीका सुरू आहे. तसेच, एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही सरफराज खानच्या संघाबाहेर राहण्याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे आणि स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करूनही त्याला संघात का स्थान दिले नाही? याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
 


सम्बन्धित सामग्री