Friday, April 25, 2025 08:42:49 PM

IPL 2025: सलमान, शाहरुख, प्रियंका चोप्रासह बॉलिवूडचा जलवा? ओपनिंग सेरेमनीत स्टार्सची मांदियाळी

यंदाच्या IPL चे विशेष आकर्षण म्हणजे भव्य उद्घाटन समारंभ. ज्यामध्ये क्रिकेटसोबतच बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांची चमक चाहत्यांना पहायला मिळणार आहे.

ipl 2025 सलमान शाहरुख प्रियंका चोप्रासह बॉलिवूडचा जलवा ओपनिंग सेरेमनीत स्टार्सची मांदियाळी
IPL 2025: सलमान, शाहरुख, प्रियंका चोप्रासह बॉलिवूडचा जलवा! ओपनिंग सेरेमनीत स्टार्सची मांदियाळी

कोलकाता : जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या प्रतीक्षेची घडी संपली आहे. IPL 2025 स्पर्धेचा थरार 22 मार्चपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरू होणार आहे. यंदाच्या हंगामाची सुरुवात गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होणार आहे. दरम्यान, यंदाच्या IPL चे विशेष आकर्षण म्हणजे भव्य उद्घाटन समारंभ. ज्यामध्ये क्रिकेटसोबतच बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांची चमक चाहत्यांना पहायला मिळणार आहे. 

यंदाच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडमधील मोठे कलाकार सहभागी होणार आहेत. शाहरुख खान, प्रियंका चोप्रा आणि सलमान खान यांची उपस्थिती राहण्याची शक्यता असल्याने कार्यक्रमाला विशेष ग्लॅमर मिळणार आहे. शाहरुख आपल्या संघ कोलकाता नाईट रायडर्सच्या पहिल्या सामन्यात हजेरी लावणार आहे, तर सलमान खान आपल्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहे.

हेही वाचा - टीम नाही, वादळ आहे! IPL 2025 मध्ये अशी आहे SRH ची भेदक प्लेइंग 11

उद्घाटन समारंभात अरजीत सिंग, श्रेया घोषाल, करण औजला, दिशा पटानी, श्रद्धा कपूर आणि वरुण धवन यांचे शानदार सादरीकरण होणार आहे. तसंच अमेरिकन पॉप बँड ‘वन रिपब्लिक’ यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यांच्या लाईव्ह परफॉर्मन्सची चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. उद्घाटन सोहळ्यात कॅटरीना कैफ, अनन्या पांडे, माधुरी दीक्षित, जान्हवी कपूर, करीना कपूर, पूजा हेगडे, आयुष्मान खुराना आणि सारा अली खान हे सेलिब्रिटी देखील हजेरी लावणार आहेत. त्यामुळं क्रिकेटसह मनोरंजनाचा हा सोहळा चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.

हेही वाचा - IPL संघ कोण विकत घेऊ शकतो? एक संघ खरेदीसाठी किती पैसे लागतात

74 सामन्यांचा महाथरार
IPl 2025 च्या हंगामात 13 वेगवेगळ्या ठिकाणी 74 सामने खेळवण्यात येणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स हे दहा संघ विजेतेपदासाठी लढणार आहेत.


सम्बन्धित सामग्री