Vijay Hazare Trophy: शतक हुकलं पण मन जिंकलं ! दुखापतीनंतर मैदानात उतरताच श्रेयस अय्यरची तुफान खेळी; 53 चेंडूत काढल्या ‘इतक्या’ धावा

3 महिन्यांहून अधिक काळ दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेल्या अय्यरने विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवली.<br/>

Vijay Hazare Trophy: शतक हुकलं पण मन जिंकलं ! दुखापतीनंतर मैदानात उतरताच श्रेयस अय्यरची तुफान खेळी; 53 चेंडूत काढल्या ‘इतक्या’ धावा

Vijay Hazare Trophy: भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज आणि मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने क्रिकेटच्या मैदानावर दिमाखदार पुनरागमन केले आहे. 3 महिन्यांहून अधिक काळ दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेल्या अय्यरने विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवली.

केवळ 53 चेंडूत 82 धावांचा पाऊस

6 जानेवारी रोजी हिमाचल प्रदेश विरुद्ध झालेल्या सामन्यात श्रेयस अय्यरने कर्णधाराला साजेसा डाव खेळला. त्याने केवळ 53 चेंडूंमध्ये 150 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 82 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार मारले. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने पहिल्याच सामन्यात आपण फॉर्मात असल्याचे सिद्ध केले आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: आधी हात ओढला अन् मग… चाहत्याने केलं असं काही की रोहित शर्माला आला राग; नेमकं काय झालं? पाहा Viral Video

दुखापतीमुळे होता मैदानाबाहेर

ऑक्टोबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झेल घेताना श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते आणि तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेलाही मुकला होता. मात्र, प्रदीर्घ काळानंतर मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले.

मुंबईला दिले 299 धावांचे लक्ष्य

प्रथम फलंदाजी करताना मुंबईची अवस्था 55 धावांत 2 बाद अशी नाजूक झाली होती. मात्र, सलामीवीर मुशीर खान (73 धावा, 51 चेंडू) आणि श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरला. अय्यरने संघाचा स्कोअर वेगाने 200 च्या पुढे नेला. तो शतकाच्या जवळ पोहचला असताना 26 व्या षटकात बाद झाला. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने हिमाचल प्रदेशसमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान ठेवले.

हेही वाचा – Pratika Rawal : "जर कोणतीही थर्ड पार्टी माझ्या…" वर्ल्डकप गाजवणाऱ्या स्टार खेळाडूला राग अनावर! पोस्ट करत व्यक्त केली नाराजी

टीम इंडियासाठी गुड न्यूज 

अय्यरचा हा फॉर्म भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी अय्यरची भारतीय संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, या मालिकेत त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी अय्यरची ही खेळी भारतीय चाहत्यांसाठी मोठा सुखद संकेत मानला जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number