Shreyas Iyer: श्रेयस अय्यरचा अनपेक्षित निर्णय, सामन्याच्या काही तासांपूर्वी कर्णधारपद सोडलं; आता नेतृत्वाची जबाबदारी ‘या’ खेळाडूकडे

भारतीय क्रिकेटमध्ये आणखी एक मोठी घटना घडली आहे. भारताच्या अ संघाचं नेतृत्व करणारा श्रेयस अय्यरने अचानक कर्णधारपद सोडत संघातून माघार घेतली आहे.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरचा अनपेक्षित निर्णय, सामन्याच्या काही तासांपूर्वी कर्णधारपद सोडलं; आता नेतृत्वाची जबाबदारी ‘या’ खेळाडूकडे

भारतीय क्रिकेटमध्ये आणखी एक मोठी घटना घडली आहे. भारताच्या अ संघाचं नेतृत्व करणारा श्रेयस अय्यरने अचानक कर्णधारपद सोडत संघातून माघार घेतली आहे. आशिया चषकादरम्यान भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात चालू असलेल्या अनऑफिशियल कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी अय्यरचा हा निर्णय समोर आला. त्यामुळे संघ व्यवस्थापनासोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरने वैयक्तिक कारणास्तव तातडीने मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जाण्यानंतर संघाचं नेतृत्व उपकर्णधार ध्रुव जुरेलकडे सोपवण्यात आलं आहे. अय्यरने या मालिकेतून माघार घेतली असली तरी त्याच्या जागी अन्य खेळाडूची निवड अद्याप झालेली नाही. बीसीसीआयला दिलेल्या कळवणीत त्याने वैयक्तिक कारणामुळे विश्रांतीची मागणी केली असल्याचं समजतं.

हेही वाचा: Asia Cup 2025: पाकिस्तानला नमवल्यानंतर भारताचा पुढील सामना कोणाशी?; वाचा कधी, कुठे आणि किती वाजता पाहता येईल सामना

भारत अ संघ आणि ऑस्ट्रेलिया अ संघातील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात अय्यरकडून फारशी अपेक्षित कामगिरी झाली नाही. दुसऱ्या सामन्यापूर्वी त्याने घेतलेला निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे. विशेष म्हणजे, आयपीएल 2025 हंगामात अय्यरने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे आशिया चषकासाठी त्याचं नाव चर्चेत होतं. मात्र, त्याला अंतिम संघात स्थान मिळालं नाही. या निवडीबद्दल आधीच माध्यमांमध्ये चर्चा रंगली होती.

अय्यरने मुंबईला परतल्यानंतर त्याच्या जाण्यामागे नेमकं कोणतं कारण आहे, याबद्दल अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्याचं कारण पूर्णपणे वैयक्तिक आहे. परंतु चाहत्यांमध्ये आणि तज्ज्ञांमध्ये मात्र वेगवेगळ्या अटकळी सुरू झाल्या आहेत. अनेकांनी हे निर्णय त्याच्या मानसिक ताणाशी जोडून पाहिलं आहे. ध्रुव जुरेलला अचानक कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्याने त्याच्यासाठी ही मोठी संधी आहे. युवा खेळाडू म्हणून जुरेलला या मालिकेत स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. दुसऱ्या सामन्यात तो कसा प्रदर्शन करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Ind vs Pak Asia Cup 2025 : 'आम्ही युद्ध जिंकलो…', पाकिस्तानी क्रिक्रेटपटूच्या पत्नीने भारताला डिवचलं
 

येत्या वेस्ट इंडिज मालिकेसाठी निवड समिती अय्यरच्या नावाचा विचार करणार असल्याचं समजतं. मात्र त्याच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्या निवडीवर परिणाम होईल का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या भारतीय संघ व्यवस्थापन त्याच्या वैयक्तिक कारणांचा सन्मान करत असल्याचं समजतं. श्रेयस अय्यर हा मर्यादित षटकांचा तसेच कसोटी क्रिकेटमधील महत्त्वाचा फलंदाज मानला जातो. त्याची आक्रमक शैली आणि संघाला दिलेला स्थैर्यपूर्ण आधार यामुळे तो कायम चर्चेत राहिला आहे. मात्र गेल्या काही काळात दुखापतींमुळे आणि सातत्याच्या अभावामुळे त्याला संघात जागा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

आता अय्यरच्या या अनपेक्षित निर्णयामुळे त्याच्या पुढील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या त्याच्या चाहत्यांमध्ये फक्त एकच प्रश्न फिरत आहे “श्रेयस अय्यरने नेमकं अचानक मुंबईला का परतायचं ठरवलं?”

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number