Tuesday, February 17, 2026 11:07:56 PM

Asia Cup 2025 Trophy Controversy : पाकिस्तानी मंत्री मोहसीन नकवींनी ट्रॉफी स्वतःकडेच ठेवली; परत देण्यासाठी BCCI ने दिली मुदत

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध बिघडलेत. भारतीय संघाने पाकिस्तानी मंत्र्याकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला. तेव्हा नकवी ही ट्रॉफी स्वतःसोबत घेऊन गेले. आता BCCI अॅक्शन मोडमधे आले आहे

asia cup 2025 trophy controversy  पाकिस्तानी मंत्री मोहसीन नकवींनी ट्रॉफी स्वतःकडेच ठेवली परत देण्यासाठी bcci ने दिली मुदत

Asia Cup 2025 Trophy Controversy : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून टीम इंडियाने दिमाखात किताब जिंकला. मात्र, या विजयानंतरही भारतीय संघाला अद्याप अधिकृत ट्रॉफी मिळालेली नाही. भारतीय क्रिकेट संघाने (Team India) आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. या नकारामागे मोठे राजकीय कारण आहे.
ACC अध्यक्षांकडून विजेतेपदाची ट्रॉफी हॉटेलमध्ये नेल्याने BCCI 'ॲक्शन' मोडमध्ये आले आहे. BCCI ने आता ICC कडे तक्रारी करण्याची तयारी केली आहे.

मोहसीन नकवी यांच्यामुळे निर्माण झाला वाद
नियमानुसार, विजेत्या संघाला ट्रॉफी देण्याचा अधिकार ACC प्रमुखाचा असतो. परंतु, मोहसीन नकवी हे केवळ ACC अध्यक्ष नाहीत. ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष असण्यासोबतच पाकिस्तान सरकारमध्ये इंटिरियर मंत्री देखील आहेत.
भारताचा आक्षेप: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध बिघडलेले असताना, भारतीय संघाने पाकिस्तानी मंत्र्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
BCCI चा प्रस्ताव: बीसीसीआयने (BCCI) मोहसीन नकवी यांच्याऐवजी अमीरात क्रिकेट बोर्डाच्या उपाध्यक्षांच्या हस्ते ट्रॉफी द्यावी, असे सुचवले होते.

नकवींच्या कृतीमुळे वाढला तणाव
भारतीय संघाने नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर मोहसीन नकवी यांनी केलेल्या कृत्यामुळे बीसीसीआय प्रचंड संतापले आहे. बीसीसीआयच्या अपेक्षेनुसार ट्रॉफी दुसऱ्या अधिकाऱ्याकडून न देता, ACC अध्यक्ष मोहसीन नकवी ती ट्रॉफी हॉटेलमध्ये घेऊन गेले. टूर्नामेंटमधील एका जबाबदार व्यक्तीकडून असे वर्तन अपेक्षित नव्हते, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे आणि हे 'सहन करण्यापलीकडे' असल्याचे मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा - Ind Vs Pak: निर्लज्ज पणाचा कळस! पाकिस्तानी संघ सामन्याची फी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना देणार

BCCI कडून 'ॲक्शन' आणि मुदत
मोहसीन नकवी यांच्या या कृतीनंतर बीसीसीआय पूर्ण 'ॲक्शन' मूडमध्ये आहे. बीसीसीआयचे सेक्रेटरी देवजीत साइकिया यांनी नकवी यांना आपली चूक सुधारण्याची एक संधी दिली आहे. नकवी यांना अजूनही ट्रॉफी परत करण्याची मुदत आहे. जर नकवी यांनी लवकरात लवकर आशिया कपची ट्रॉफी टीम इंडियाला दिली नाही, तर बीसीसीआय त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्याची तयारी करत आहे. याचा अर्थ, मोहसीन नकवी यांच्याकडे भारताला ट्रॉफी परत करण्यासाठी ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे.
जर नकवी यांनी ट्रॉफी परत केली नाही, तर बीसीसीआय नोव्हेंबरमध्ये दुबईत होणाऱ्या आयसीसीच्या (ICC) कॉन्फरन्समध्ये या प्रकरणावर आपला विरोध नोंदवू शकते किंवा अधिकृत तक्रार दाखल करू शकते.

फायनलमध्ये भारताचा दणदणीत विजय
आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला 5 विकेटने पराभूत केले होते. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाकिस्तानला आमंत्रित केले. त्यांनी 20 षटकांत 146 धावा केल्या, तर टीम इंडियाने 147 धावांचे लक्ष्य 20 व्या षटकात 5 विकेट्स गमावून पूर्ण केले.

हेही वाचा - Asia Cup 2025 Final : पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... "ऑपरेशन सिंदूर मैदानातही सुरूच"


सम्बन्धित सामग्री