Monday, March 09, 2026 09:05:41 AM

T20 WC 2026, Super 8: भारताच्या हातातून सुवर्णसंधी निसटली! दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावताच भारताच्या नावे नकोसा रेकॉर्ड

टी-20 विश्वचषक 2026 च्या 'सुपर 8' फेरीत भारतीय संघाचा विजयी वारू दक्षिण आफ्रिकेने चक्क 76 धावांच्या भल्यामोठ्या फरकाने रोखला. या पराभवासोबत भारतीय संघाने नकोसा विक्रम नावे केला आहे.

t20 wc 2026 super 8 भारताच्या हातातून सुवर्णसंधी निसटली दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावताच भारताच्या नावे नकोसा रेकॉर्ड

टी-20 विश्वचषक 2026 च्या 'सुपर 8' फेरीत भारतीय संघाचा विजयी वारू दक्षिण आफ्रिकेने चक्क 76 धावांच्या भल्यामोठ्या फरकाने रोखला. सलग चार विजयांच्या दिमाखात मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार यादवच्या सेनेला या स्पर्धेतील पहिल्यावहिल्या पराभवाचा कडवा घोट प्यावा लागला. दक्षिण अफ्रिकेने भारतासमोर 187 धावांचं आव्हान ठेवलेल असताना संपूर्ण भारतीय संघ 18.5 षटकांत अवघ्या 111 धावांवर गारद झाला.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या आयसीसी स्पर्धेतील विजयाच्या मालिकेला खंड पडला आहे. या पराभवासोबत भारतीय संघाने नकोसा विक्रम नावे केला आहे. 

हेही वाचा- IND vs SA: संजू सॅमसनचं होणार पुनरागमन? अभिषेक-तिलकच्या फ्लॉप शोनंतर प्रशिक्षकांच्या विधानाने खळबळ

19 नोव्हेंबर 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाची पुनरावृत्ती काल पुन्हा एकदा याच मैदानावर अवतरली. यापूर्वी 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 49 धावांनी पराभव झाला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताचा 2019 मध्ये वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 80 धावांनी पराभव झाला होता. तसेच 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत देखील भारताने पराभवाचं तोंड पाहिलं होत.

हेही वाचा- Abhishek Sharma: पराभवानंतर फुटलं भांडं! अभिषेक शर्माच्या बॅटमधून धावा का निघत नव्हत्या? समोर आलं धक्कादायक कारण

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडविरूद्ध शेवटचा पराभव झाला होता. त्यानंतर भारताने टी20 वर्ल्डकप 2024, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीत सलग विजय मिळवला होता. त्यानंतर आता दक्षिण अफ्रिका आणि भारत आमनेसामने आले असून भारताला 76 धावांनी पराभवाला समोरे जावे लागले आहे. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. 


सम्बन्धित सामग्री