रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल स्टेडियममध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे. यापुर्वी रांचीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 17 धावांनी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला होता. यादरम्यान तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे.
रांचीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियातील वेगवान गोलंदाज हर्षित राणाने पहिल्या षटकात रायन रिकेल्टन आणि क्विंटन डी कॉक या दोन मोठ्या विकेट्स घेत तुफान कामगिरी बजावली होती. मात्र चालू मॅचमधील त्याच्याकडून झालेल्या एका कृतीमुळे आयसीसीने हर्षित राणाला डिमेरिट पॉइंट देत तंबी दिली आहे.
रांचीतील पहिल्या वनडे सामन्यात डेवाल्ड ब्रेविसची तिसरी विकेट घेतली. त्यामुळे तो अतिआक्रमक झाला. ब्रेविसला बाद केल्यानंतर त्याने मैदानात त्याला बोट दाखवत पॅव्हेलियनकडे जाण्याचा इशारा केला एवढच नव्हे तर त्याच्या तोंडाच्या हालचालीवरून तो ब्रेविसला अपशब्द बोलल्याचे देखील वाटत होत.
या त्याच्या कृतीवर आयसीसीने म्हटलं की, 'हर्षितला खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे.' आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.5 हे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान फलंदाजाला बाद केल्यानंतर त्याला आक्षेपार्ह किंवा त्रासदायक वाटणारी भाषा, कृती किंवा हावभाव वापरण्यासंबंधित आहे.
दरम्यान गेल्या 2 वर्षांमध्ये हर्षित राणाची ही पहिली चूक असून त्याचा हा पहिलाच फाउल आहे. त्यामुळे त्याने आपली चूक मान्य करत, आयसीसी एलिट पॅनलचे मॅच रिफरी रिची रिचर्डसन याने दिलेली सजा स्वीकारली.