FIH Youth Hockey5s Asian Championship: मस्कतमध्ये तिरंगा फडकला! पाकिस्तानचा पराभव करत भारताने ‘हॉकी 5-एस विश्वचषका’त पटकावले विजेतेपद

अंतिम फेरीत भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-1 असा पराभव करत 'एलिट पूल' गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

FIH Youth Hockey5s Asian Championship: मस्कतमध्ये तिरंगा फडकला! पाकिस्तानचा पराभव करत भारताने ‘हॉकी 5-एस विश्वचषका’त पटकावले विजेतेपद

FIH Youth Hockey5s Asian Championship: मस्कत येथे 25 जुलै रोजी पार पडलेल्या FIH युथ हॉकी 5-एस आशियाई चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय सब-ज्युनियर पुरुष हॉकी संघाने चमकदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम फेरीत भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-1 असा पराभव करत ‘एलिट पूल’ गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. यापूर्वीच्या सामन्यातही भारताने पाकिस्तानवर 7-3 असा दणदणीत विजय मिळवला होता, ज्यामुळे संघ पूर्ण आत्मविश्वासाने मैदानात उतरला होता. सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी पकड मजबूत ठेवली आणि अवघ्या 13 व्या मिनिटापर्यंत 3 गोल डागून पाकिस्तानवर पूर्ण दबाव निर्माण केला.

हेही वाचा – IND vs ZIM : टीम इंडियाने पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठलं! झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय मिळवत भारताने तो हिशेब केला पूर्ण

सामन्याच्या पहिल्या सत्रात रोमित पालने 5 व्या मिनिटाला गोल डागून भारताचे खाते उघडले. त्यानंतर कर्णधार केतन कुशवाहने 12 व्या मिनिटाला आणि शाहरुख अलीने 13 व्या मिनिटाला गोल करत भारताला 3-0 अशी मजबूत व निर्णायक आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानकडून मोहम्मद उस्मानने 16 व्या मिनिटाला एकमेव गोल केला; मात्र, त्यानंतर भारतीय रक्षकांनी प्रतिस्पर्धी संघाचे पुनरागमन करण्याचे सर्व प्रयत्न उधळून लावले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी FIH युथ हॉकी 5-एस विश्वचषकातील आपले स्थान पक्के केले आहे.

भारतीय संघाच्या या शानदार यशानंतर हॉकी इंडियाने खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला आहे. विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपये, तर सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला 1 लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच, FIH युथ हॉकी 5-एस आशियाई चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात चीनकडून 4-2 असा पराभव स्वीकारून उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाचाही हॉकी इंडियाने गौरव केला आहे. महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांना 50,000 रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number