धरमशाला : धरमशाला येथे पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. पंजाब किंग्सने आपले पहिले सात सामने जिंकून हंगामाची सुरुवात खूप चांगली केली होती. मात्र, आता त्यांनी सलग चार सामने त्यांनी गमावले आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा जिवंत ठेवण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक होते. मुंबई इंडियन्सने कालचा सामना जिंकून पंजाब किंग्सवर 6 गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे पंजाब आता प्लेऑफमधून बाहेर पडली आहे. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी घेत 200धावांचा डोंगर रचला. मात्र मुंबई इंडियन्सच्या तुफानी गोलंदाजांसमोर त्यांचा टिकावं लागणं कठिण दिसत होतं. दहा विकेट्स गमावून अगदी अखेरच्या चेंडूपर्यंत खेळून हा सामना रंजक केला. नंतर मुंबईने फलंदाजी करत चार विकेट्स गमावून 205 धावा करत हा सामना जिंकला.
सलग पाचवा सामना गमावल्याने पंजाब किंग्स निराश झाले आहेत. ते 13 गुणांवरच अडकले असून, आता चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्ससारखे संघ प्लेऑफच्या लढतीत त्यांच्या अगदी जवळ आहेत. त्यांच्या गोलंदाजांना पुन्हा एकदा चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांची फलंदाजी सर्वोत्तम नसली तरी, त्यांनी 200 धावांची भक्कम धावसंख्या उभारण्यात यश मिळवले. रायन रिकेल्टनने अवघ्या 23 चेंडूंमध्ये 48 धावा करून धावांचा पाठलाग जलद गतीने सुरू करून दिला. झेवियर बार्टलेटने तिलक वर्माला यष्टींवर एक आखूड चेंडू टाकला. तिलकने चेंडूची दिशा लवकर ओळखली, बाजूला वळला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जोरदार फटका मारला. चेंडू सीमारेषेच्या अगदी वरून गेला आणि षटकार मिळाला. या फटक्यामुळे मुंबई इंडियन्सने सामना जिंकला आणि तिलकने आनंदाने जल्लोष केला.