Vaibhav Suryavanshi : परिक्षेच्या आधीच वैभवचा निकाल! अंडर-19 विश्वविजेता दहावीच्या परीक्षेला बसणार नाही; स्वत: वडिलांनी सांगितलं कारण

अंडर-19 विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा भारताचा उदयोन्मुख स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीबाबत नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे.

Vaibhav Suryavanshi : परिक्षेच्या आधीच वैभवचा निकाल! अंडर-19 विश्वविजेता दहावीच्या परीक्षेला बसणार नाही; स्वत: वडिलांनी सांगितलं कारण

अंडर-19 विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा भारताचा उदयोन्मुख स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीबाबत नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या 10 वीच्या बोर्ड परीक्षेला वैभव सूर्यवंशी बसणार नसल्याची माहिती वैभवच्या वडिलांनी स्वतः दिली आहे. क्रिकेटमधील यशानंतर आता शैक्षणिक आयुष्यातील या महत्त्वाच्या परीक्षेमुळे वैभवची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. वैभव सूर्यवंशी हा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर परिसरातील एका खासगी शाळेचा विद्यार्थी आहे.

हेही वाचा- India Vs Pakistan Match: कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला नमवून भारताचा सुपर-8 मध्ये दिमाखात प्रवेश, 6 पॉईंट्सने पोहोचला पहिल्या स्थानावर

CBSE बोर्डाने त्याचे प्रवेशपत्र जारी केले असून त्याचे परीक्षा केंद्र 'पोद्दार इंटरनॅशनल स्कूल' येथे लागले होते. मात्र आता वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला बसणार नाही, ताजपूर येथील मॉडेस्टी स्कूलच्या प्राचार्यांनी वैभवच्या वडिलांशी बोलल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यांनी असं स्पष्ट केलं की, बीसीसीआय सोबतच्या वचनबद्धतेमुळे वैभवला दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसता येणार नाही. जरी त्याची तयारी आणि परीक्षा केंद्राशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाली असली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबतच्या क्रिकेट वचनबद्धतेमुळे वैभव परीक्षा देऊ शकणार नाही. 

हेही वाचा- Suryakumar Yadav Post: पाकिस्तानचा 'सूर्या'स्त! विश्वचषकात भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर सूर्यकुमार यादवने 'या' 3 शब्दांत विषय संपवला
वैभव परिक्षेला बसणार म्हणून त्याची अंडर-19 विश्वचषक जिंकून आल्यानंतरची लोकप्रियता पाहता त्याच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी पोलिसांना सोपवली होती. मात्र शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट केले की कोणत्याही विद्यार्थ्यासाठी विशेष सुरक्षा प्रदान केली जाणार नसून परीक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थ्यांना नियम लागू होतील. मात्र आता बीसीसीआयसोबतच्या करारामुळे वैभव 10 वीचा पेपरच देऊ शकणार नाही. 

विश्वचषकातील 'धडाका' आणि आयपीएलची तयारी

वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्धच्या अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये अवघ्या 80 चेंडूत 15 षटकारांच्या मदतीने 175 धावांची झंझावाती खेळी केली होती. या ऐतिहासिक कामगिरीनंतर तो भविष्यातील 'सुपरस्टार' म्हणून ओळखला जात आहे. तो आता IPL 2026 ची तयारी सुरू करेल. वैभव सध्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा भाग असून, आयपीएलमध्येही त्याच्याकडून अशाच स्फोटक कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number