Thursday, November 13, 2025 07:38:48 AM

IND vs AUS 4th T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी20 सामना कधी आणि कुठे खेळला जाईल? 'या' ठिकाणी पाहता येईल लाईव्ह स्ट्रीमिंग

पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले तीन सामने संपल्यानंतर सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता दोन्ही संघांसाठी चौथा T20 सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

ind vs aus 4th t20 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी20 सामना कधी आणि कुठे खेळला जाईल या ठिकाणी पाहता येईल लाईव्ह स्ट्रीमिंग

IND vs AUS 4th T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमांचक T20 मालिका आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले तीन सामने संपल्यानंतर सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता दोन्ही संघांसाठी चौथा T20 सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

चौथा T20 सामना कधी आणि कुठे खेळवण्यात येईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा T20 सामना गुरुवार, 6 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट शहरात खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:45 वाजता सामन्याला सुरुवात होईल. तसेच दुपारी 1:15 वाजता टॉस होईल. टीम इंडिया या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.  

हेही वाचा - Women’s World Cup 2025: महिला विश्वचषक 2025 मध्ये पाकिस्तानला किती पैसे मिळाले? रक्कमेतील फरक ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

सामना कुठे पाहता येईल?

हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहू शकता. याशिवाय डीडी स्पोर्ट्स (DD Sports) वरही सामन्याचे थेट प्रक्षेपण होईल.

मोबाईल आणि ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग

स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टॅबवर सामना पाहायचा असल्यास, तुम्ही तो JioCinema किंवा Disney+ Hotstar अॅपवर तसेच त्यांच्या वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम करू शकता.

हेही वाचा - Asia Cup 2025: BCCI कडून रायझिंग स्टार्स एशिया कपसाठी भारत अ संघाची घोषणा; जीतेश शर्मा करणार नेतृत्व 

दरम्यान, 29 ऑक्टोबर रोजी खेळलेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसरा टी-20 सामना कमी धावांचा होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना 4 विकेट्सने जिंकला आणि मालिकेत भारतावर 1-0 अशी आघाडी घेतली. 2 नोव्हेंबर रोजी होबार्ट येथे तिसरा टी-20 सामना खेळला गेला, जो भारतीय संघाने 5 विकेट्सने जिंकला. तीन सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. दोन्ही संघ 6 नोव्हेंबर रोजी होणारा चौथा टी-20 जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेण्याचे लक्ष्य ठेवतील. म्हणूनच, आता चौथा सामना दोन्ही संघांसाठी मालिकेत महत्त्वाची आघाडी घेण्याची संधी ठरणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या