Sunday, March 08, 2026 11:41:00 PM

T20 World Cup 2026 IND vs SA : सामन्याच्या काही तास आधी गूढ हालचाल! अभिषेक शर्मा गौतम गंभीरसोबत काळ्या कारमधून नेमका कुठे रवाना झाला?

आज दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारत यांच्यातील सामन्या पूर्वीटीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यात सामना सुरु होण्याआधी काहीतरी कुणकुण सुरु असल्याचे दृष्य पाहायला मिळाले आहेत.

t20 world cup 2026 ind vs sa  सामन्याच्या काही तास आधी गूढ हालचाल अभिषेक शर्मा गौतम गंभीरसोबत काळ्या कारमधून नेमका कुठे रवाना झाला

आयसीसी टी२० वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीला सुरुवात झाली असून साखळी फेरीत दमदार कामगिरी करत भारताने सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. अशातच आज रविवारी 22 फेब्रुवारीला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रंगतदार सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. त्यापूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यात सामना सुरु होण्याआधी काहीतरी कुणकुण सुरु असल्याचे दृष्य पाहायला मिळाले आहेत.

हेही वाचा- Hardik Pandya: विभक्त होऊनही जबाबदारीत कसर नाही; हार्दिकने नताशा आणि मुलाला दिली आलिशान कार भेट, किंमत ऐकून व्हाल थक्क

अभिषेक शर्मा आणि गौतम गंभीर एका काळ्या एसयूव्हीमध्ये हॉटेलमधून बाहेर पडताना दिसले. खरं तर अभिषेक शर्मा सलग तीन सामन्यात शून्य धावांवर बाद झाला आहे ज्यामुळे अद्याप त्याने त्याचे खाते उघडले नाही. टी20 विश्वचषकात अमेरिकेविरुद्ध पहिला सामना खेळत असताना अभिषेक पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तसेच पाकिस्तानविरुद्ध खेळताना देखील तो अपयशी ठरला. अखेर नेदरलँड्सविरुद्ध खेळताना अभिषेकने तीन चेंडूंवर शून्य धावा केल्या. 

हेही वाचा- T20 World Cup 2026: एकही सामना न खेळता भारत सेमीफायनलमध्ये? ICC चा नियम ऐकून तुम्हीही चकित व्हाल
त्यामुळे आजचा हाय-व्होल्टेज सामना पाहता चाहत्यांना अभिषेक शर्माच्या फॉर्मबद्दल चिंता वाढली. असं असताना अभिषेक शर्माने स्थानिक गोलंदाजांच्या मदतीने एक खाजगी इनडोअर नेट सेशन आयोजित केले. 15 मिनिटांच्या या सराव सत्रात अभिषेकने रिब-लाइन बॉलिंग आणि राउंड-द-विकेट ऑफ-स्पिनचा सामना केला. एकीकडे संघातील इतर खेळाडू हे हॉटेलमध्येच असताना अभिषेक त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि दक्षिण आफ्रिकेच्या मजबूत गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध फॉर्ममध्ये परतण्यास सज्ज होत असल्याचे पाहायला मिळत आहे. फॉर्ममध्ये परतण्यासाठी फोकस आणि कठोर मेहनतीचा संघाला नक्कीच फायदा होणार आहे. 


सम्बन्धित सामग्री