IPL 2026 अंतिम टप्प्याकडे वळत आहे. TOP 4 मध्ये जाण्यासाठी सगळ्या संघांमध्ये शर्यत सुरू आहे. काही संघ चांगल्या स्थितीत आहेत तर काही संघ TOP 4 जाण्यासाठी अजूनही झगडत आहेत. प्रत्येक संघांचे चार ते पाच सामने शिल्लक आहेत. प्लेऑफ्सच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर राहण्यासाठी 14 गुण गरजेचे असतात. त्या हिशेबाने TOP 4 मध्ये जाण्यासाठी कोणत्या संघाला किती सामने जिंकावे लागतील याबाबत जाणून घेऊया.
पंजाब किंग्स –
पंजाब किंग्सचे पाच सामने उरले आहेत. पाचपैकी पंजाबने एक सामना जिंकला तरी ते TOP 4 मध्ये प्रवेश करू शकतील. पंजाबचे 9 सामन्यानंतर 13 गुण आहेत. त्यांचे पुढील तीन सामने हैदराबाद, दिल्ली आणि मुंबई विरुद्ध आहेत. TOP 4 मध्ये जाण्याच्या पंजाबच्या शक्यता ८८% आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे पाच सामने उरले आहेत. त्यांचे पुढचे तीन सामने लखनऊ, मुंबई आणि कोलकाता विरुद्ध आहेत. उरलेल्या पाच सामन्यांपैकी त्यांना एक सामना जिंका गरजेचं आहे. बंगळुरूच्या प्लेऑफ्समध्ये जाण्याच्या शक्यता 84% आहेत.
सनरायझर्स हैदराबाद –
ऑनपेपर हलका संघ वाटणाऱ्या हैदराबादने कमालीची कामगिरी करून सगळ्यांना चकित केलंय. एसआरएचचे चार सामने शिल्लक आहेत. त्यांचे पुढचे तीन सामने पंजाब गुजरात आणि चेन्नई विरुद्ध आहेत. सनरायझर्स हैदराबादला चारपैकी एक सामना जिंकायची गरज आहे. त्यांच्या TOP 4 मध्ये जाण्याच्या शक्यता 68 % आहेत.
राजस्थान रॉयल्स –
राजस्थान रॉयल्सनेदेखील सनरायझर्स हैदराबादप्रमाणे 10 सामने खेळले आहेत. राजस्थानला चार पैकी एक सामना जिंकायची गरज आहे. राजस्थानच्या TOP 4 मध्ये जाण्याच्या शक्यता 67% आहेत कारण हैदराबादच्या तुलनेत त्यांचं नेट रनरेट कमी आहे.
गुजरात टायटन्स –
गुजरात टायटन्सचे दहा सामने खेळले आहेत. त्यांचे पुढील तीन सामने राजस्थान, हैदराबाद आणि कोलकाता विरुद्ध आहेत. गुजरात टायटन्सच्या प्लेऑफ्स
जाण्याच्या शक्यता 57% टक्के आहेत.
चेन्नई सुपर किंग्स –
चेन्नई सुपर किंग्सने 9 सामने खेळले आहेत. चेन्नईचे पाच सामने शिल्लक आहेत. सहापैकी तीन सामने जिंकणे चेन्नईसाठी गरजेचं आहे. त्यांचे पुढचे तीन सामने दिल्ली आणि सलग दोन सामने लखनऊ विरुद्ध आहेत. चेन्नईच्या प्लेऑफ्समध्ये जाण्याच्या शक्यता 17% टक्के आहेत.
दिल्ली कॅपिटल्स –
दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईप्रमाणे ९ सामने खेळले आहेत. दिल्लीचे पाच सामने शिल्लक आहेत. त्यातील तीन सामने जिंकणं दिल्लीसाठी गरजेचे आहे. त्यांचे पुढील तीन सामने चेन्नई, कोलकाता आणि पंजाब विरुद्ध आहेत. प्लेऑफ्समध्ये जाण्याच्या शक्यता 12% टक्के आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स –
कोलकाता नाईट रायडर्सने ९ सामने खेळले आहेत. त्यांचे पाच सामने बाकी आहेत. या पाच सामन्यांपैकी त्यांना चार सामने जिंकणे गरजेचे आहे. त्यांचे पुढील तीन सामने दिल्ली, बंगळुरू आणि गुजरात विरुद्ध आहेत. कोलकाता नाईट रायडर्सच्या TOP 4 मध्ये जाण्याच्या शक्यता 7% आहेत.
मुंबई इंडियन्स –
मुंबई इंडियन्सने दहा सामने खेळले आहेत. मुंबईला उर्वरित चार सामन्यांपैकी चार सामने जिंकणे गरजेचे आहे. मुंबईचे पुढील तीन सामने बंगळुरू, पंजाब आणि कोलकता विरुद्ध आहेत. कोलकाता नाईट रायडर्स TOP 4 मध्ये जाण्याच्या शक्यता 0.3% आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स –
लखनऊ सुपर जायंट्सने नऊ सामने खेळले आहेत आणि त्यांचे पाच सामने शिल्लक आहेत. त्यांचे पुढील तीन सामने बंगळुरू आणि दोन सलग सामने चेन्नईविरुद्ध आहेत. लखनऊ सुपर जायंट्सने उर्वरित सर्व सामने जिंकले तरीही ते TOP 4 मध्ये जाऊ शकत नाहीत. लखनऊ सुपर जायंट्सच्या TOP 4 मध्ये जाण्याच्या शक्यता 0.1% आहेत.