IND W vs SA W Final World Cup 2025: नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चा अंतिम सामना आज 2 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. भारतीय महिला संघाचा सामना दक्षिण आफ्रिका संघाशी होईल. हा अंतिम सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे, कारण विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे महिला क्रिकेटला एक नवीन विश्वविजेता मिळेल. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत पाऊस पडत आहे. मुंबईतील अनेक भागात आज सकाळपासून पाऊस पडत आहे. यामुळे आजच्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये पाऊस पडल्यास, नेमका नियम काय?, विश्वचषकाची ट्रॉफी कोणाला मिळणार?, जाणून घेऊयात.
फायनलमध्ये पाऊस पडल्यास विश्वचषकाची ट्रॉफी कोणाला मिळणार?
फायनल सामना आज दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. एक्युवेदरच्या अंदाजानुसार, आज पावसाची शक्यता सुमारे 63 टक्के आहे, तर संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत ही शक्यता 50 टक्क्यांपर्यंत राहील. याच मैदानावर भारत-बांगलादेशचा लीग सामना पावसामुळे रद्द झाला होता. जर रविवारचा सामना पावसामुळे पूर्ण झाला नाही, तर राखीव दिवस सोमवारी, 3 नोव्हेंबरला ठेवण्यात आला आहे. परंतु सोमवारीही नवी मुंबईत 55 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर दोन्ही दिवस पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात येईल.
हेही वाचा : Women World Cup Final: नवी मुंबईत आज वर्ल्डकप फायनल; पावसाचे विघ्न ठरवणार का सामन्याचं भविष्य?
भारताची संभाव्य Playing XI:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा/राधा यादव, क्रांती गौड, श्रीचरणी, रेणुका ठाकूर
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य Playing XI:
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, सुने लुस, अनेके बॉश/मसाबता क्लास, ॲनेरी डेर्कसेन, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा
भारताचा संपूर्ण संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, उमा छेत्री, शेफाली वर्मा.
दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), अयाबोंगा खाका, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, मारिझान कॅप, तझमिन ब्रिट्स, सिनालो जाफ्ता, नॉनकुलुलेको मलाबा, ॲनेरी डेर्कसेन, ॲनेके बॉश, मसाबता क्लास, सुने लुस, कराबो मेसो, तुमी सेखुखुने, नोंदुमिसो शांगासे.