वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसामातील दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघातील अंतिम सामना रविवारी 5 फेब्रुवारीला वडोदराच्या कोटाम्बीमध्ये बीसीए स्टेडियमवर रंगला. यावेळी स्मृती मानधनाच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने वूमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यावेळी सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक आरसीबीने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे प्रथम फलंदाजी करण्याचा मान दिल्ली कॅपिटल्सला मिळाला. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीसमोर 203 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पुर्ण करत आरसीबीने 19.4 ओव्हरमध्ये 204 धावा करत दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेटनं पराभव केला.
हेही वाचा- WPL 2026 Final : स्मृतीच्या बॅटमधून तुफानी इनिंग! फायनलमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत केला रेकॉर्ड्सचा पाऊस
यंदाचा महिला प्रीमियर लीग 2026 हा स्पर्धेचा चौथा हंगाम ठरला असून, हंगामाच्या समाप्तीनंतर विजेत्या संघासह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. अंतिम सामन्यात बाजी मारणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ट्रॉफीसह 6 कोटी रुपयांचं रोख बक्षीस पटकावलं, तर उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्स संघाला 3 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. याशिवाय स्पर्धेदरम्यान सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज, ऑलराऊंडर आणि ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेल्या खेळाडूंनाही आकर्षक रोख बक्षिसांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
हेही वाचा- WPL Final 2026 : रणरागिणींची विजयी गर्जना! दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत RCB ने दुसऱ्यांदा उंचावला WPL चषक
यावेळी स्मृती मानधाना सर्वाधिक 377 धावा करून ऑरेंज कॅपची मानकरी ठरली तर गुजरात जायंट्सच्या सोफी डिवाईनने सर्वाधिक 17 विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकली, तसेच या हंगामातील सर्वोत्तम खेळाडू देखील ठरली आहे. त्याचसोबत दिल्ली कॅपिट्लसची नंदिन शर्मा सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू ठरली. त्याबद्दल त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये बक्षीस मिळाले.
WPL 2026 मधील पुरस्कार आणि बक्षीस रक्कम
विजेते - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (6 कोटी)
उपविजेते - दिल्ली कॅपिटल्स (3 कोटी)
उदयोन्मुख खेळाडू - नंदिनी शर्मा (दिल्ली कॅपिटल्स) (5 लाख)
हंगामातील सर्वोत्तम खेळाडू - सोफी डिवाईन (गुजरात जायंट्स) (5 लाख)
ऑरेंज कॅप - स्मृती मानधना (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) (5 लाख)
पर्पल कॅप - सोफी डिवाईन (गुजरात जायंट्स) (5 लाख)
सर्वाधिक षटकार - हरमनप्रीत कौर (मुंबई इंडियन्स) (5 लाख)
सर्वोत्तम स्ट्राईक रेट - ग्रेस हॅरिस (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) (5 लाख)
सर्वोत्तम झेल - लुसी हेमिल्टन (दिल्ली कॅपिटल्स) (5 लाख)
सर्वाधिक डॉट बॉल - लॉरेन बेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) (5 लाख)
फेअर प्ले ऍवॉर्ड - मुंबई इंडियन्स (5 लाख)