Saturday, July 20, 2024 01:03:38 PM

IND vs ZIM
हरारेमध्ये हरुन सुरुवात

झिम्बाब्वेमधील हरारे येथे वीस - वीस षटकांच्या पाच सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला.

हरारेमध्ये हरुन सुरुवात

हरारे : झिम्बाब्वेमधील हरारे येथे वीस - वीस षटकांच्या पाच सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. झिम्बाब्वेने भारताविरुद्धचा पहिला वीस - वीस षटकांचा सामना १३ धावांनी जिंकला. 

पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेने वीस षटकांत नऊ बाद ११५ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना भारताने १९.५ षटकांत सर्वबाद १०२ धावा केल्या. यामुळे झिम्बाब्वेने भारताविरुद्धचा पहिला वीस - वीस षटकांचा सामना १३ धावांनी सहज जिंकला. 

सामनावीर - सिकंदर रझा, झिम्बाब्वे

           

सम्बन्धित सामग्री