नागपूर मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी? उमेदवार जाहीर करताच फडणवीसांची डोकेदुखी वाढली; नेमकं कारण काय?

नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने सुधाकर कोहळे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी होण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

नागपूर मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी? उमेदवार जाहीर करताच फडणवीसांची डोकेदुखी वाढली; नेमकं कारण काय?
Nagpur BJP

भाजपने आज महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच पैकी तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने सुधाकर कोहळे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी होण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. माजी आमदार अनिल सोले उद्या दुपारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

नागपूरचे माजी महापौर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू सहकारी म्हणून अनिल सोले यांची ओळख आहे. गेल्या पदवीधर मतदारसंघात निवडणुकीच्या वेळीही भाजपने अनिल सोले यांना ऐनवेळी डावलून संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. पक्षाच्या या निर्णयानंतर अनिल सोले आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

हेही वाचा- “आमच्या कामाचे श्रेय तटकरे घेतात” शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली; शिंदेसेनेतील नेत्याचा तटकरेंना सबुरीचा सल्ला

सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे अखेर सोले यांनी बंडाचे निशाण फडकवण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर त्यांचा अधिकृत प्रचारही सुरू झाला होता. मात्र, या मतदारसंघासाठी भाजपने आज सुधाकर कोहळे यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपकडून सुधाकर कोहळे आणि अनिल सोले हे इच्छुक उमेदवार होते. अनिल सोले यांचा सोशल मीडियावर त्याप्रकारचे प्रचारही सुरू झाले होते.

गेल्या पदवीधर निवडणुकीत भाजपने अनिल सोले यांना ऐनवेळी डावलून संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. अनिल सोले हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय आणि सहकारी म्हणून ओळखले जातात. अनिल सोले यांनी नागपूरचे महापौरपदही भूषवले आहे. दरम्यान भाजपनं उमेदवारी जाहीर करताच नागपूरमधून त्यांना धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number