जंतर-मंतरवर गोंधळ! अरविंद केजरीवाल पोलिसांच्या ताब्यात;‘आप’च्या अनेक नेत्यांची धरपकड

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

जंतर-मंतरवर गोंधळ! अरविंद केजरीवाल पोलिसांच्या ताब्यात;‘आप’च्या अनेक नेत्यांची धरपकड
Arvind Kejriwal

दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आयोजित आंदोलनादरम्यान आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे राजधानीतील राजकीय वातावरण तापलं आहे. संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज यांच्यासह आपच्या इतर नेत्यांवरही पोलिसांनी कारवाई केली.

जंतर-मंतर परिसरात पोलिसांची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे अनेक नेते आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते. मात्र, आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर संबंधित नेत्यांना पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात नेण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं.

दरम्यान, जंतर-मंतर परिसरातून 1500 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावाही करण्यात आला आहे. या कारवाईमागील नेमकी कारणं आणि ताब्यात घेतलेल्या आंदोलकांबाबतची पुढील प्रक्रिया याविषयी अधिकृत माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number