‘मी प्रचंड धक्क्यात होते, काय करावं सुचत नव्हतं…’; फ्लाईदुबईचे कॅप्टन मच्छार यांच्या पत्नीने सांगितला कठीण प्रसंगाचा अनुभव

भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांच्या पत्नी सोनल मच्छार यांनी या घटनेनंतरची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही बातमी समजताच त्या प्रचंड धक्क्यात होत्या आणि नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी, हे समजून घेण्याची मानसिक क्षमताही उरली नव्हती, असा अनुभव त्यांनी कथन केला.

‘मी प्रचंड धक्क्यात होते, काय करावं सुचत नव्हतं…’; फ्लाईदुबईचे कॅप्टन मच्छार यांच्या पत्नीने सांगितला कठीण प्रसंगाचा अनुभव

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाईदुबईच्या विमानावर सह-वैमानिकाने केलेल्या हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या कठीण प्रसंगात अफाट धैर्य दाखवून 174 प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांच्या पत्नी सोनल मच्छार यांनी या घटनेनंतरची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही बातमी समजताच त्या प्रचंड धक्क्यात होत्या आणि नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी, हे समजून घेण्याची मानसिक क्षमताही उरली नव्हती, असा अनुभव त्यांनी कथन केला.

“रुग्णालयात पतीला पाहिल्यावर मिळाला मोठा दिलासा”

‘CNN-News18’ शी बोलताना सोनल मच्छार म्हणाल्या की, घटनेच्या वेळी कुटुंब, मित्रपरिवार आणि भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला. गुरुवारी अबू धाबी येथील रुग्णालयात जाऊन त्यांनी पतीची भेट घेतली. “ते सध्या योग्य हातात आहेत आणि युएईचे डॉक्टर व लष्करी वैद्यकीय पथक त्यांची उत्तम काळजी घेत आहे,” असे सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले. आता त्यांचे संपूर्ण लक्ष कॅप्टन स्मित लवकर बरे होऊन घरी परतण्यावर केंद्रित आहे. तसेच, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी बोलण्याबाबत विचारले असता, प्रकृती सुधारल्यानंतर स्मित स्वतः त्यांच्याशी संवाद साधतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींशी संवाद

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात कॅप्टन स्मित मच्छार यांनी कॉकपिटमधील थरारक प्रसंगाचे वर्णन केले. कॅप्टन मच्छार म्हणाले, “माझ्या 17 वर्षांच्या उड्डाण अनुभवामुळे विमान वेगाने खाली येत असल्याचे माझ्या तात्काळ लक्षात आले. गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेलो असताना मी स्वतःला बजावले की, मला एक शेवटचा प्रयत्न करावाच लागेल.” हल्लेखोराचा हल्ला सुरू असतानाही त्यांनी जिद्दीने कॉकपिटचा दरवाजा उघडला, ज्यामुळे इतर कर्मचारी आणि प्रवाशांना आत येऊन हल्लेखोराला रोखणे शक्य झाले.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉलवर साधला पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांच्याशी संवाद; अफाट धैर्याचं केलं भरभरून कौतुक

मोदींकडून धैर्याचे कौतुक; इतर प्रवाशांच्या मदतीचाही उल्लेख

कॅप्टन मच्छार यांनी सांगितले की, स्वतःचा जीव वाचवण्यासोबतच विमानातील निष्पाप प्रवाशांना मरू न देणे हेच त्यांचे मुख्य ध्येय होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या या प्रसंगावधानाचे आणि अतुलनीय धैर्याचे भरभरून कौतुक केले. या संभाषणात कॅप्टन मच्छार यांनी नमूद केले की, विमानाचे सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात केबिन क्रू आणि प्रवासी म्हणून प्रवास करणाऱ्या इतर 2 वैमानिकांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची ठरली.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number