Dhanteras 2026: दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची एक वेगळी खासियत आहे. वसुबारसपासून ते भाऊबीज आणि तुळशी विवाहापर्यंत प्रत्येक दिवसाला पुराणात विशेष महत्त्व आहे.धार्मिक परंपरेनुसार, वसुबारसला गो-धनाची पूजा केली जाते, धनत्रयोदशीला सोने खरेदी आणि गुंतवणूक केली जाते, नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान करून कारटं फोडले जाते, तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी वर्ग चोपडीपूजन तर नोकरदार वर्ग पैशांची पूजा करतात. पाडवा हा पती-पत्नीच्या सुखी संसारासाठीचा दिवस मानला जातो आणि सरतेशेवटी भाऊबीजेला बहीण भावाला प्रेमाने ओवाळते.
मान्यतेनुसार, नरक चतुर्दशीच्या पहिल्या आंघोळीला आई, पाडव्याला पत्नी तर भाऊबीजेच्या दिवशी बहीण उटणे लावते. अशा विविध परंपरांनी हा सण साजरा केला जातो. त्यातच धनत्रयोदशी म्हणजे सोने खरेदी आणि गुंतवणुकीचा दिवस. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र, यंदा सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 30 हजार रुपयांच्या पुढे गेल्याने सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे महाग झाले आहे. अशा परिस्थितीत कमी रकमेपासून गुंतवणूक करण्यासाठी कोणते स्मार्ट पर्याय उपलब्ध आहेत? जाणून घेऊया.
1. Digital Gold आणि Gold ETF – कमी रकमेत सोन्यात गुंतवणूक
प्रत्यक्ष सोने खरेदी करणं शक्य नसेल, तर Digital Gold किंवा Gold ETF चा विचार करता येऊ शकतो. काही डिजिटल प्लॅटफॉर्मवर कमी रकमेतही सोने खरेदी करता येतं.
फायदा: प्रत्यक्ष सोने साठवून ठेवण्याची गरज नसते. Gold ETF च्या माध्यमातून शेअर बाजारात सोन्याच्या किमतीशी संबंधित गुंतवणूक करता येते. मात्र, शुल्क, कर आणि जोखीम समजून घेणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा – दिवाळीपूर्वी घर चमकवायचंय? एका दिवसात घर करा स्वच्छ; जाणून घ्या सोपी ट्रिक
2. चांदीच्या नाण्यांऐवजी Silver ETF चा पर्याय
चांदीत गुंतवणूक करायची असेल, तर Silver ETF चा विचार करता येऊ शकतो. प्रत्यक्ष चांदी खरेदी करताना काही अतिरिक्त खर्च लागू शकतात.
फायदा: Silver ETF च्या माध्यमातून प्रत्यक्ष चांदी साठवण्याची गरज न पडता चांदीच्या किमतीतील चढ-उतारांशी संबंधित गुंतवणूक करता येते. मात्र, चांदीच्या किमतीतही मोठे चढ-उतार होऊ शकतात.
3. Mutual Fund SIP – दरमहा छोटी बचत, दीर्घकालीन नियोजन
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर गुंतवणुकीची सुरुवात करायची असेल, तर म्युच्युअल फंड SIP हा एक पर्याय ठरू शकतो. काही योजनांमध्ये दरमहा 500 रुपयांपासून SIP सुरू करता येते.
Expert Tip: तुमच्या बजेटनुसार SIP सुरू करा आणि उत्पन्न वाढल्यावर गुंतवणुकीची रक्कम वाढवण्याचा विचार करा. मात्र, म्युच्युअल फंडातील परतावा बाजारावर अवलंबून असतो आणि त्याची हमी नसते.
4. Health Insurance आणि Term Insurance – कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी
खरी आर्थिक समृद्धी म्हणजे केवळ पैसा वाढवणं नव्हे, तर कुटुंबाचं आर्थिक संरक्षण करणंही होय. त्यामुळे धनत्रयोदशीच्या निमित्ताने हेल्थ इन्शुरन्स किंवा टर्म लाइफ इन्शुरन्स घेण्याचा विचार करता येऊ शकतो.
फायदा: हेल्थ इन्शुरन्समुळे पात्र वैद्यकीय खर्चांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होऊ शकते, तर टर्म इन्शुरन्समुळे विमाधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळू शकतं. पॉलिसीच्या अटी आणि अपवाद समजून घ्या.
महाराष्ट्रातील पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूक निकालासंबंधीच्या सर्व बातम्या एका क्लिकवर-
विधान परिषद मतदारसंघ निकाल | Maharashtra MLC Election Results
5. REIT – कमी रकमेत रिअल इस्टेटमधील गुंतवणूक
घर किंवा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करणं बजेटच्या बाहेर असेल, तर REIT (Real Estate Investment Trust) हा पर्याय समजून घेता येऊ शकतो.
REIT च्या माध्यमातून व्यावसायिक मालमत्तांशी संबंधित गुंतवणूक करता येते. काही REIT गुंतवणूकदारांना उत्पन्नाचे वितरण करतात. मात्र, मिळणारी रक्कम आणि गुंतवणुकीचं मूल्य निश्चित नसतं.
(Disclaimer: ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशासाठी असून, गुंतवणुकीतील नफा-तोट्यासाठी ‘जय महाराष्ट्र’ जबाबदार राहणार नाही.)
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-