पाण्याच्या मुद्द्यावरून डोंबिवलीत संतापाचा उद्रेक; अपुरा पुरवठा अन् 36 तासांच्या कपातीविरोधात रहिवाशांचे थेट अधिकाऱ्यांना आव्हान

प्रशासनाने शुक्रवारी आणि शनिवारी मिळून सलग 36 तास संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो रहिवाशांनी बुधवारी थेट एमआयडीसीच्या स्थानिक कार्यालयावर धडक दिली.

पाण्याच्या मुद्द्यावरून डोंबिवलीत संतापाचा उद्रेक; अपुरा पुरवठा अन् 36 तासांच्या कपातीविरोधात रहिवाशांचे थेट अधिकाऱ्यांना आव्हान
Dombivli MIDC water cut

राज्यातील अनेक भागांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध ठिकाणी कपातीचे नियोजन केले जात आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात आधीच भेडसावणाऱ्या समस्येत अधिक भर पडल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. प्रशासनाने शुक्रवारी आणि शनिवारी मिळून सलग 36 तास संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो रहिवाशांनी बुधवारी थेट एमआयडीसीच्या स्थानिक कार्यालयावर धडक दिली. ऐन तीव्र उन्हाच्या आणि टंचाईच्या काळात असा दीर्घ शटडाऊन लादल्यास सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होतील, असा इशारा देत नागरिकांनी हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची आक्रमक मागणी केली आहे.

एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा

दरम्यान, बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास निवासी परिसरातील जवळपास 100 हून अधिक त्रस्त नागरिकांनी एकत्र येत एमआयडीसी कार्यालयावर उत्स्फूर्त मोर्चा काढला. यावेळी पूर्वकल्पना देऊनही कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत हे कामानिमित्त अनुपस्थित असल्याने, आंदोलकांनी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता औदुंबर आलाट यांची भेट घेतली. रहिवाशांनी अधिकाऱ्यांसमोर दूषित पाणीपुरवठा, अपुरा दाब आणि नियमित टंचाईचा पाढा वाचत प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. विभागातील पाणी गळती आणि बेकायदेशीर पाणीचोरीवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, तसेच नियोजित 36 तासांची कपात रद्द करून पाण्याचे योग्य वितरण करावे, अशी कडक मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा –  कल्याणकरांचा प्रवास होणार सुसाट! होणार 6 लेनचा पूल; कुठे अन् कसा? जाणून घ्या सविस्तर

आधीच अपुरा पुरवठा, त्यात 36 तासांचा खंड

एमआयडीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शुक्रवार आणि शनिवार असा सलग दीड दिवसाचा पाणीपुरवठा ठप्प राहणार आहे. आधीच आठवड्यातून अनेक दिवस नळांना कमी दाबाने आणि अनियमित पाणी येत असल्याने नागरिकांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण जात आहे. अशा परिस्थितीत सलग 36 तास पाणी बंद राहिल्यास गृहसंकुलांमधील टँकरवर विसंबून राहावे लागेल आणि पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने रहिवाशांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number