FDA आयुक्त तुकाराम मुंडेंची मोठी कारवाई! बनावट खाद्यतेलाचा पर्दाफाश; विनापरवाना उत्पादनाचा भंडाफोड

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव MIDC मध्ये तुकाराम मुंडेंनी मोठी कारवाई केली आहे.

FDA आयुक्त तुकाराम मुंडेंची मोठी कारवाई! बनावट खाद्यतेलाचा पर्दाफाश; विनापरवाना उत्पादनाचा भंडाफोड
Tukaram Munde

बुलढाणा: अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. एमआयडीसी परिसरात एक बनावट स्वरूपाचे खाद्यतेल बनवले जात होते. तसेच विना परवाना या तेलाचं उत्पादन होत होतं. मिळालेल्या महिनीनुसार तब्बल साडे तीन कोटी रुपयांचे बोगस खाद्य तेल यात जप्त केले गेले.

खामगाव एमआयडीसी मध्ये एफडीए आयुक्त तुकाराम मुडेंना या बनावट तेलविक्रीचे उत्पादन होत असल्याची बातमी मिळाली. यावर मुंडेंनी तात्काळ त्या ए एम ऑइल कंपनीवर धाड टाकली व त्यांचा पर्दाफाश केला. तुकाराम मुंडेंनी ए एम ऑइल कंपनीत उत्पादन सुरू असलेल्या बोगस खाद्यतेलावर ही कारवाई केली असून निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाच्या विक्रीवर आळा बसवला आहे.

या कंपनीतून उत्पादित झालेले खाद्यतेल ज्या ज्या ठिकाणी वितरित झाले आहे त्याचा देखील शोध आता अन्न व औषध प्रशासन घेत असल्याची माहिती तुकाराम मुंडे यांनी दिली आहे..

हेही वाचा – सराईत गुन्हेगाराची पत्नी देखील निघाली चोर; पुण्यातून दुचाकी चोर दांपत्य अखेर पोलीस कोठडीत

 

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number