मुंबई : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लगबग वाढलेली आहे. फराळ, मिठाईपासून ते जेवणासाठी गॅस सिलेंडरची मागणी वाढली असताना ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे.
गॅस सिलिंडर महागला की स्वस्त?
28 ऑक्टोबर अर्थात आज जाहीर झालेल्या दरानुसार घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही,असे समोर आले आहे. दुसरीकडे 1 ऑक्टोबर रोजी 62.50 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे हॉटेल आणि मिठाई व्यावसायिकांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
हेही वाचा – KDMC कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! बंपर दिवाळी बोनस मिळणार, कुणाला किती रुपये मिळणार?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील दर
मुंबई – घरगुती सिलेंडर 941.50 रुपये तर व्यावसायिक सिलेंडर 2,764.50 रुपये
पुणे – घरगुती 945 रुपये, व्यावसायिक 2,825 रुपये
नागपूर – घरगुती 993.50 रुपये, व्यावसायिक 2,988.50 रुपये
कोल्हापूर – घरगुती 944.50 रुपये, व्यावसायिक 2,788 रुपये
नाशिक – घरगुती 945.50 रुपये, व्यावसायिक 2,840.50 रुपये
छ. संभाजीनगर – घरगुती 950.50 रुपये, व्यावसायिक 2,869.50 रुपये
नांदेड – घरगुती 967.50 रुपये, व्यावसायिक 2,897 रुपये
अमरावती – घरगुती 975.50 रुपये, व्यावसायिक 2,924.50 रुपये
जळगाव – घरगुती 947.50 रुपये, व्यावसायिक 2,854 रुपये
अहिल्यानगर – घरगुती 955.50 रुपये, व्यावसायिक 2,855 रुपये
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update