शिशिर शिंदे शिवसेनेत

मुंबई, ३ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्याच्या राजकारण मोठी उलथापालथ सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदारांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे शिंदे फडवणवीस सरकारची ताकद वाढत असताना, शिवसेनेतही पक्षप्रवेशाचा धडाका सुरु आहे. माजी आमदार शिशिर शिंदे […]

शिशिर शिंदे शिवसेनेत

मुंबई, ३ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्याच्या राजकारण मोठी उलथापालथ सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदारांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे शिंदे फडवणवीस सरकारची ताकद वाढत असताना, शिवसेनेतही पक्षप्रवेशाचा धडाका सुरु आहे.

माजी आमदार शिशिर शिंदे यांनी सोमवारी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. शिशिर शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा दिला होता. सोबत ठाकरे गटाचे विलास पारकर देखील शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. राजकीय नेत्यांसह काही मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री अदिती सारंगधर, अक्षया देवधर आणि माधव देवचाके आज प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रम येथे हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number