नियमित पाणीपट्टी भरूनही पाणी नाही! कोंढव्यात आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात; नागरिकांचा संताप

विशेषतः एकाच आठवड्यात दोन दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहत असल्याने हजारो रहिवाशांचे दैनंदिन जीवन आणि पाणीयंत्रणेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.

नियमित पाणीपट्टी भरूनही पाणी नाही! कोंढव्यात आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात; नागरिकांचा संताप
Pune Kondhwa water shortage

पुणे शहरातील वाढत्या नागरी वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, कात्रज-कोंढवा परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नियमितपणे सर्व कर आणि पाणीपट्टी भरूनही वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे. विशेषतः एकाच आठवड्यात दोन दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहत असल्याने हजारो रहिवाशांचे दैनंदिन जीवन आणि पाणीयंत्रणेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.

कोंढवा आणि कात्रज परिसरातील विविध भागांत पाणीटंचाईची समस्या

कोंढवा परिसरातील टिळेकरनगर, साईनगर, सुखसागरनगर, गोकुळनगर, माऊलीनगर आणि संतोषनगर या दाट लोकवस्तीच्या भागात अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरातील मोठ्या सोसायट्यांपैकी एक असलेल्या ‘थ्री ज्वेल्स’ सोसायटीमध्ये तब्बल 1680 सदनिका असून, येथील हजारो नागरिक पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत. नागरिकांना सुरळीत पाणी मिळावे म्हणून या सोसायटीच्या वतीने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे शेकडो ईमेलद्वारे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे, तरीही परिस्थिती सुधारताना दिसत नाही.

आठवड्यातून दोन दिवस पाणीबंद; नागरिकांचे हाल

या भागात दर मंगळवारी नियोजित साप्ताहिक पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. त्यानंतर बुधवारी पाणी आले तरी त्याचा दाब अतिशय कमी असतो, ज्यामुळे उंच मजल्यावरील रहिवाशांपर्यंत थेंबभरही पाणी पोहोचत नाही. यातच भर म्हणून गुरुवारी पाण्याच्या टाकीच्या दुरुस्ती आणि देखभालीचे कारण पुढे करत पुन्हा एकदा शहराचा पाणीपुरवठा खंडित केला जातो. एकाच आठवड्यात लागोपाठ दोन दिवस पाणी बंद राहत असल्याने घरांमध्ये पाण्याचा प्रचंड तुटवडा निर्माण होतो. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि नोकरदार वर्गाला या अनियमिततेचा नाहक त्रास सहन करावा लागत असून, ऐन कटकटीच्या वेळी महापालिकेकडून टँकरची पर्यायी व्यवस्थाही केली जात नसल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.

हेही वाचा – कर्जत वृक्षतोडीवर फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

नियमित पाणीपट्टी भरूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष

महापालिकेचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वेळेवर भरूनही नागरिकांना मूलभूत पाण्यासाठी ताटकळत राहावे लागत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली एकाच आठवड्यात दोन दिवस नळ कोरडे राहत असल्याने नागरिकांचे बजेट आणि पाण्याचे नियोजन बिघडत चालले आहे. दुरुस्तीचे काम असल्यास साप्ताहिक पाणीबंदच्या वेळापत्रकात योग्य ते बदल करावेत, जेणेकरून एकाच आठवड्यात दोन दिवस पाणीकपात होणार नाही, अशी आक्रमक मागणी स्थानिकांनी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात बोलताना पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन खुडे यांनी स्पष्ट केले की, मंगळवारच्या क्लोजरनंतर गुरुवारीदेखील पाणी बंद ठेवावे लागल्याने हा परिणाम झाला आहे. सध्या पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला असून, परिस्थिती लवकरच सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number