अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सारा अली खान हुंदके देऊन रडू लागली! व्हिडीओ तुफान व्हायरल

सुवर्ण मंदिरात दर्शन घेत असतानाचा सारा अली खान हुंदके देऊन रडत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सारा अली खान हुंदके देऊन रडू लागली! व्हिडीओ तुफान व्हायरल
Sara Ali Khan

Sara Ali Khan Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांचा आगामी बहुचर्चित ‘उडता तीर’ हा चित्रपट येत्या 23 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, मंगळवारी 20 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या दोन्ही कलाकारांनी अमृतसर येथील पवित्र सुवर्ण मंदिरात (Golden Temple) हजेरी लावली. आपल्या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करत दोघांनीही गुरुद्वारात नतमस्तक होऊन देवाचा आशीर्वाद घेतला. यावेळी सारा अली खानने पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस तर आयुष्मानने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

गुरुद्वारात दर्शन घेताना सारा झाली भावुक
सुवर्ण मंदिरात दर्शन घेत असतानाचा सारा अली खान हुंदके देऊन रडत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गुरुद्वारात प्रार्थना करत असताना साराला अचानक अश्रू अनावर झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. ती ढसाढसा रडताना आणि हुंदके देताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुवर्ण मंदिरातील अध्यात्मिक वातावरणात अभिनेत्री अशा प्रकारे अचानक भावुक झाल्याची दृश्ये समोर आल्यानंतर हा व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा – दलेर मेहंदी मद्यधुंद अवस्थेत…, धड बोलताही येईना…, भर कार्यक्रमात मंत्र्यांचा पारा चढला; सर्वांसमोर फटकारलं, म्हणाले…

काहींकडून ट्रॉलिंग तर काहींकडून पाठींबा
सारा अली खानच्या या व्हायरल व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्सकडून विविध प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. काही नेटकऱ्यांनी तिच्या या अश्रूंना नेहमीप्रमाणे ‘ओव्हरअॅक्टिंग’ आणि पब्लिसिटी स्टंट म्हणत तिची ट्रोलिंग केली आहे. दुसरीकडे, अनेक चाहत्यांनी तिच्या बाजूने उभे राहत हे भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. पवित्र गुरुद्वारात गेल्यानंतर अनेकांना असाच अध्यात्मिक अनुभव येतो आणि अश्रू अनावर होतात, असे सांगत काही युजर्सनी स्वतःचे वैयक्तिक अनुभवही कमेंट बॉक्समध्ये शेअर केले आहेत.

साऊथ स्टार यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती
आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांच्या एकत्र अभिनय असलेला ‘उडता तीर’ हा चित्रपट आधी वेगळ्या तारखेला प्रदर्शित होणार होता. मात्र, दाक्षिणात्य सुपरस्टार यश याच्या बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक’ या चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसवरील टक्कर टाळण्यासाठी या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले होते. अखेर सर्व अडथळे पार करत हा चित्रपट आता 23 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, दर्शनादरम्यानचा हा भावुक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान ट्रेंड होत आहे.

हेही वाचा – टार्गेटवर टायगर श्रॉफ नव्हताच, तर…; आरोपीच्या स्टेटमेंटने धक्कादायक खुलासा! शिकार होता भलताच मोठा व्यक्ती

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number