दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीची तयारी सुरू आहे? शोरूममध्ये बुकिंग करण्याआधी ‘या’ गोष्टी नक्की तपासा

Dussehra Vehicle Buying Tips : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन कार किंवा बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? सणासुदीत वाहनांवर आकर्षक ऑफर्स मिळत असल्या, तरी बुकिंग करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणं आवश्यक आहे. कोणतीही घाई करण्याआधी या टिप्स नक्की जाणून घ्या
दसरा 2026
Dussehra 2026

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. असंख्य जण या शुभ मुहूर्तावर नव्या वाहनाची खरेदी करत असतात. शोरुममध्येही दसऱ्याच्या निमित्ताने मोठ्या ऑफर्स असतात. यंदाच्या दसऱ्याला तुम्हीही नवे वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर घाईघाईने बुकिंग करण्याऐवजी काही महत्त्वाच्या गोष्टी आधीच तपासून घ्या. त्यामुळे नंतर होणारा पश्चात्ताप टाळता येईल.

1. बजेट आणि ऑन-रोड किंमत तपासा
वाहनाची शोरुममध्ये जी किंमत सांगितली जाते ती म्हणजे एक्स-शोरुम असते. त्यावर आरटीओ, इन्शुरन्स, टीसीएस तसेच वाहनाच्या अॅक्सेसरीजचेही पैसे वेगळे लागतात. त्यामुळे ऑन-रोड किंमत नक्की किती येते हे वाहन खरेदीच्या आधीच स्पष्ट करुन घ्या.

हेही वाचा – गरब्याच्या तालावर थिरकताना गुडघे आणि घोट्यांवर येतोय ताण? ‘या’ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

2. वेटिंग पिरियडला बळी पडू नका
मह्त्त्वाचे म्हणजे,दसऱ्याला गाडी मिळेल असं सांगूत कित्येकदा बुकिंग घेतलं जात. मात्र, प्रत्यक्ष डिलिव्हरी ही दिवाळीनंतर होते. त्यामुळेच वेटिंग पिरियड लेखी स्वरुपातच घ्या. तुम्हाला दसऱ्या दिवशीच गाडीची डिलिव्हरी हवी असेल तर ते आधीच कन्फर्म करा.

3. डिस्काउंटच्या आमिषाला बळी पडू नका.
शोरुम कंपन्या दसऱ्यात 50 हजारांपर्यंत सूट असल्याचं सांगत असतात. मात्र त्यात बऱ्याचदा जुन्या स्टॉकवरील गाड्यांचा समावेश असतो. तुम्हीही दसऱ्याला वाहन खरेदी पूर्वी गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग वर्ष आणि VIN नंबर नक्की तपासा.

हेही वाचा – तीच तीच ऑक्सिडाइज्ड रिंग घालणं सोडा! यंदाच्या नवरात्रीत ‘या’ स्टायलिश रिंग्सने गरबा नाईटला द्या रॉयल टच

4. इन्शुरन्स आणि फायनान्स
वाहन खरेदी करायला गेल्यानंतर ग्राहकांना शोरुममधून इन्शुरन्स आणि लोन घेण्याची सक्ती केली जाते, असे दिसून आले आहे. मात्र, तुम्हाला बाहेर यापेक्षा स्वस्त पर्याय मिळतो का, याची नक्की तुलना करा. व्याजदर तसेच प्रोसेसिंग फी ही आधीच तपासा.

5. फीचर्स आणि टेस्ट ड्राइव्ह
वाहन खरेदी करण्यापूर्वी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे, फक्त फोटो पाहून गाडी कधीच बूक करु नका. तुम्हाला आवडलेल्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेऊन इंजिन, मायलेज तसेच फीचर्स स्वत: नक्की अनुभवा.

 

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version