पृथ्वीच्या अगदी जवळ येणार ‘शनी’; खगोलप्रेमींना दिसणार ग्रहाची कडी अन् अनोखा नजारा, कधी? वाचा सविस्तर

या कालावधीत शनी आणि पृथ्वीमधील अंतर सरासरीपेक्षा खूपच कमी होणार असल्याने ग्रहाची कडी (Rings) आणि त्याचा तेजस्वी रूप न्याहाळण्याची ही खगोलप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.

पृथ्वीच्या अगदी जवळ येणार ‘शनी’; खगोलप्रेमींना दिसणार ग्रहाची कडी अन् अनोखा नजारा, कधी? वाचा सविस्तर
Saturn

Saturn Opposition 4 October 2026: सूर्यमालेतील सर्वात देखणा ग्रह मानला जाणारा शनी येत्या 4 ऑक्टोबर रोजी पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ पोहोचणार आहे. खगोलशास्त्रात या दुर्मिळ स्थितीला ‘प्रतियुती’ (Opposition) म्हटले जाते, ज्यामध्ये शनी ग्रह आणि सूर्य हे पृथ्वीच्या अगदी समोरासमोर येतात. या कालावधीत शनी आणि पृथ्वीमधील अंतर सरासरीपेक्षा खूपच कमी होणार असल्याने ग्रहाची कडी (Rings) आणि त्याचा तेजस्वी रूप न्याहाळण्याची ही खगोलप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.

आकाशात कधी अन् कसे पाहाता येणार शनीचे रूप?
4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सूर्यास्त होताच पूर्व क्षितिजावर शनी ग्रहाचे आगमन होईल आणि तो रात्रभर आकाशात चमकेल. तेजस्वी आणि काळसर पिंगट रंगाचा असल्यामुळे हा ग्रह साध्या डोळ्यांनीही सहज ओळखता येईल. मात्र, शनीची जगप्रसिद्ध आणि मनमोहक कडी स्पष्टपणे पाहण्यासाठी चांगल्या क्षमतेच्या दुर्बिणीची (Telescope) आवश्यकता असेल. यापूर्वी 21 सप्टेंबर 2025 रोजी शनी पृथ्वीच्या अत्यंत समीप आला होता.

हेही वाचा – UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; 4 आठवड्यांत मागितलं उत्तर

शनी ग्रहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये
सौरमालेतील या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या शनी ग्रहाविषयी नेहमीच शास्त्रज्ञांना मोठी उत्सुकता वाटत राहिली आहे. जाणून घेऊ, शनी ग्रहाबद्दलची रंजक तथ्ये –
कड्यांचा विस्तार: शनीची कडी प्रामुख्याने बर्फाच्या कणांपासून बनलेली असून ती सुमारे 270,000 किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेली आहेत.
व्यास व आकारमान: ग्रहाचा व्यास सुमारे 120,000 किलोमीटर असून त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या तब्बल 95 पट आहे.
चंद्र व तापमान: शनीला एकूण 82 चंद्र असून ‘टायटन’ हा त्याचा सर्वात मोठा चंद्र आहे. ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे उणे 180°C इतके अतिशीत असते.
परिक्रमा व मोहिमा: शनीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 29.5 वर्षे लागतात. या ग्रहाच्या अभ्यासासाठी कॅसिनी आणि व्होयाजर यांसारख्या प्रसिद्ध अंतराळ मोहिमा राबवण्यात आल्या आहेत.

मानवी जीवनावर कोणताही अनिष्ट परिणाम नाही; अंधश्रद्धा बाळगू नका
शनी ग्रह पृथ्वीजवळ आल्यामुळे मानवी जीवनावर किंवा राशींवर कोणताही वाईट प्रभाव पडत नाही, असे स्पष्टीकरण खगोल अभ्यासकांनी दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर किंवा अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता या दुर्मिळ खगोलीय चमत्काराचा आणि विज्ञानाचा पुरेपूर आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! बँक कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मोठा निर्णय! रात्री उशिरा संघटनांची बैठक; अखेर काय ठरलं?

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number