Smartphone Tips : सध्या सर्वच कंपन्यांचे मोबाईल रिचार्जचे दर वाढले आहेत. तांत्रिक प्रगतीमुळे आणि इंटरनेटच्या वाढत्या गरजेमुळे पूर्वी महिनाभर चालणारा 1 जीबी डेटा दिवसभरही पुरत नाही. त्यामुळे बहुतेकजण 1.5 जीबी इंटरनेट प्रतिदिवस मिळणारा रिचार्ज करतात. पण कधी-कधी तोही पुरत नाही तर, कधी तो झटपट संपल्याचे अचानकपणे लक्षात येते. समजत नाही की, रोज दिवसभर चालणारं इंटरनेट इतक्या लवकर कसं संपलं..
तर, आज आपण हेच जाणून घेणार आहोत की, असं कशामुळे होतं आणि यावर काय करावं.. आज आम्ही तुम्हाला अशा काही सेटिंग्ज सांगणार आहोत ज्या तुम्ही बदलल्यास तुमचा मोबाईल डेटा सेव्ह होऊ शकतो. या सेटिंग्ज काय आहेत चला पाहूया..
स्मार्ट फोनचा स्मार्ट वापर सध्या वाढला आहे. वर्क फ्रॉम होमने तर यात मोठी क्रांती आणली आहे. शिवाय, मोबाईल आणि इंटरनेटमुळे आपली अनेक कामे घरी बसून पूर्ण करता येतात. इंटरनेटचा वापरच जास्त होत असेल तर जास्त मोठा इंटरनेट रिचार्ज करावा लागणार, हे सहाजिक आहे. पण बरेच लोक या गोष्टीबद्दल चिंतेत असल्याचे दिसून येते की, आपण इंटरनेटचा जास्त वापर करत नाही आणि तरीही आपल्याला समजत नाही की दररोजचा 1.5 जीबी डेटा कुठे जातो.
हेही वाचा - काही Mobile Apps करताहेत बेईमानी; Uninstall केल्यानंतरही असतो डेटा चोरीचा धोका
जर तुमचा डेली 1.5 जीबी डेटा फार काही वापर न करताही दिवस संपण्यापूर्वीच संपत असेल तर, ही माहिती तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स आणि सेटिंग्जबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही जर केल्या तर तुमचा दररोजचा 1.5 जीबी डेटा तुम्हाला संपूर्ण दिवसभर पुरेल.
- काही वेळा मोबाईल अॅप्स बॅकग्राऊंडला डेटा वापरत राहतात. तेव्हा इंटरनेटची गरज नसताना मोबाईल डेटा बंद करून ठेवा.
- काही वेळा मोबाईलमध्ये काही ऑटो-अपडेटस् होत राहतात. त्या नको असतील तर बंद करा.
- व्हॉटस अॅप किंवा इतर कोणत्याही अॅपमध्ये फोटो-व्हिडिओ ऑटो-डाऊनलोडिंग सुरू असेल तर ते बंद करा.
- इंटरनेटचा पासवर्ड शेजारी कोणाशी शेअर केला असेल तर, त्यांच्याकडून इतरही वेला डेटा वापरला जाण्याची शक्यता असते. तेव्हा हा पासवर्ड शक्यतो शेअर करू नका. केलाच असेल तर, पासवर्ड बदला आणि सेटिंग्जमधून त्या व्यक्तीचे नावही हटवा.
- मोबाईल इंटरनेट जर लॅपटॉपला दिले जात असेल तर, लॅपटॉपमधील ऑटो-अपडेट बंद ठेवा.
- लॅपटॉपमधील काही ब्राऊजर जास्त इंटरनेटचा वापर करतात. यासाठी यातील तज्ज्ञांशी चर्चा करून इंटरनेटचा वापर कमी करणारे ब्राऊजर माहीत करून घ्या. ते इन्स्टॉल करा आणि तुमचे काम त्यावर काम करा.
मोबाईलमधील कोणते अॅप जास्त डेटा वापरत आहे का?
- जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या अॅपची आवश्यकता असते तेव्हा आपण ते डाउनलोड आणि इन्स्टॉल करतो. पण नंतर जेव्हा त्याची आवश्यकता नसते तेव्हा फोनमधून असे अॅप अनइन्स्टॉल करायचे आपल्याकडून राहून जाते.
- बऱ्याचदा आपल्या फोनवर इन्स्टॉल केलेले अॅप्स आपल्या नकळत बॅकग्राउंडमध्ये डेटा वापरत असतात आणि दिवस संपण्यापूर्वी आपला दररोजचा 1.5GB डेटा संपतो. कोणते अॅप सर्वात जास्त डेटा वापरत आहे हे तपासण्यासाठी, तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जा आणि नंतर सिम आणि नेटवर्क सेटिंग्जवर क्लिक करा.
- सिम आणि नेटवर्क सेटिंग्ज उघडल्यानंतर, सिमच्या नावावर क्लिक करा. उदाहरणार्थ, जर तुमच्या फोनमध्ये दोन सिम कार्ड असतील, तर तुम्हाला येथे दिसेल की, कोणते सिम कोणत्या स्लॉटमध्ये स्थापित केले आहे. जर तुमचा मोबाईल डेटा दोन्हीपैकी ज्या सिममधून चालू असेल त्या सिमच्या नावावर क्लिक करा.
- यानंतर, पुढील स्टेपमध्ये तुम्हाला App Data Usage ऑप्शन दिसेल, या ऑप्शनवर क्लिक करताच तुम्हाला कळेल की, कोणते अॅप सर्वात जास्त डेटा वापरत आहे. जर तुम्हाला जास्त डेटा वापरणारे अॅप नको असेल तर ते अनइन्स्टॉल करा.
हेही वाचा - रोबो आणि AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने प्रेग्नन्सी; IVF यशस्वी होऊन पहिल्या बाळाचा जन्म