Data Security : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात 'डेटा' ही बाब अत्यंत महत्त्वाची बनली आहे. कोणत्याही कंपनीला स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर, त्यांना वेगवेगळ्या पातळ्यांवर विविध स्वरूपाच्या 'डेटा'ची गरज असते. हा डेटा म्हणजे कधी आपली वैयक्तिक माहिती असू शकते तर कधी आर्थिक बाबींची माहिती असू शकते. पण कोणत्याही परिस्थितीत आपल्या संदर्भातील डेटा आपली व्यक्तिगत मालमत्ता असतो.
तुम्हाला माहीत आहे का, काही मोबाईल अॅप्स अशा प्रकारची असतात, जी मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यापासून आपला डेटा चोरायला सुरुवात करतात. आपल्या परवानगीशिवाय तर कधी परवानगीने ही आपला डेटा अॅक्सेस करू लागतात. हा डेटा त्यांच्याद्वारे इतरांना विकलाही जाऊ शकतो. तर, ही चोरी ठरते आणि आपल्या प्रायव्हसीवरही आघात ठरतो. काही अॅप्स तर मोबाईलमधून अनइन्स्टॉल केल्यानंतरही डेटा अॅक्सेस करत राहतात.
हेही वाचा - रोबो आणि AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने प्रेग्नन्सी; IVF यशस्वी होऊन पहिल्या बाळाचा जन्म
ही बाब जाणून तुम्हाला धक्का बसू शकतो. फोनमधून अॅप डिलीट किंवा अनइन्स्टॉल केल्यानंतरही ती डेटा चोरत राहतात. पण हे कसे घडते आणि अशी काही अॅप्स मोबाईलमध्ये आहेत का, ते कसं समजणार? आणि आपल्या डेटाची चोरी रोखायची कशी? तर, आज हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Google Play Store किंवा Apple App Store वरून अॅप डाउनलोड केल्यानंतर, अॅप्स तुमचे मेसेज, कॉन्टॅक्ट्स, गॅलरी इत्यादींसह अनेक परमिशन मागू लागतात. जोपर्यंत तुम्ही त्यांना या सर्व परमिशन देत नाही तोपर्यंत अॅप्स काम करत नाहीत. आपण सर्वजण या अॅप्सना चालवण्याची परवानगी देतो, पण तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही फोनवरून हे अॅप्स डिलीट किंवा अनइन्स्टॉल केल्यानंतरही, या अॅप्सना तुमच्या डेटाचा पूर्ण अॅक्सेस असतो?
चला जाणून घेऊ, कोणते अॅप तुमचा डेटा डिलीट केल्यानंतरही तो अॅक्सेस करत आहे, हे तुम्ही सहजपणे कसे शोधू शकता? ही एक प्रकारची 'चोरी' आहे जी अॅप अनइन्स्टॉल केल्यानंतरही थांबत नाही. या अॅप्सना डेटा अॅक्सेस करण्यापासून कसे रोखता येईल ते आपण समजून घेऊया.
डेटा चोरणारी अॅप्स शोधण्याची पद्धत : सर्वप्रथम मोबाईल फोनची सेटिंग्ज उघडा, त्यानंतर तिथे गुगल ऑप्शनवर क्लिक करा. गुगल ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर, 'ऑल सर्व्हिसेस' वर टॅप करा. त्यानंतर कनेक्टेड अॅप्स ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर, तुम्ही ज्या सर्व थर्ड पार्टी अॅप्ससोबत डेटा शेअर केला आहे त्यांची नावे तुम्हाला कळतील. या लिस्टमध्ये तुम्हाला अशा अॅप्सची नावे देखील दिसतील, जी तुम्ही फोनमधून अनइन्स्टॉल केली आहेत. तर अनइन्स्टॉल केल्यानंतरही दिसणारी ही अॅप्स डेटा चोरणारी असतात.
उदाहरण: लिस्टमध्ये पहिले नाव 'XYZ123' होते. तुम्ही हे अॅप फोनवरून पूर्वीच डिलीट केले आहे. पण तरीही या अॅपचे नाव या यादीत दिसत आहे. तर अशा अॅप्सना आमचा डेटा अॅक्सेस करण्यापासून रोखण्यासाठी, त्या अॅपच्या नावावर क्लिक करावे.
यानंतर Delete All Connections वर क्लिक करा. त्यानंतर पुढील स्टेपमध्ये तुम्हाला Confirm वर टॅप करावे लागेल. फोनमधून काढून टाकलेल्या सर्व अॅप्ससाठी तुम्हाला ही प्रोसेस एक-एक करून फॉलो करावी लागेल.
हेही वाचा - YouTube Shorts मध्ये येणार नवे AI फीचर्स! व्हिडिओ बनवणं होणार अधिक सोपं