How to Detect Hidden Camera in Hotel Room : अलीकडे अनेक नवतरुण, तसंच मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीयांमध्ये पर्यटनाची क्रेझ वाढली आहे. शासनही पर्यटनाला अनुकूल धोरणं राबवण्याचे प्रयत्न करत असल्याने पर्यटनाला चालना मिळत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेल्यावर साहजिकच हॉटेलमध्ये राहावं लागतं. काही हॉटेल रूम्समध्ये छुपे कॅमेरे बसवलेले असू शकतात. त्यांचा गैरवापर करून काही व्हिडिओ शूट केले जातात आणि ते व्हायरल होतात. हे कृत्य बेकायदा असतं. मात्र, तरीही तसे अनेक प्रकार घडतात. आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, तर तिथे असा काही छुपा कॅमेरा आहे का, हे कसं ओळखायचं, याबद्दल जाणून घेऊ या.
हॉटेलच्या रूममध्ये किंवा सार्वजनिक शौचालय किंवा चेंजिंग रूममध्ये असे छुपे कॅमेरे असू शकतात. या लपलेल्या कॅमेऱ्यांमुळे लोकांची प्रायव्हसी धोक्यात येते. अशा घोटाळ्यांमध्ये वाढ होत असताना, हॉटेलच्या खोल्यांमध्ये गोपनीयता राखणे ही एक गंभीर चिंता बनली आहे. लपलेले कॅमेरे बहुतेकदा घड्याळे, स्मोक डिटेक्टर, यूएसबी चार्जर किंवा सजावटीच्या वस्तूंसारख्या दैनंदिन वस्तूंमध्ये लपवलेले असतात, ज्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी शोधणे कठीण होते. अशा हल्ल्यांच्या जोखमीमध्ये वैयक्तिक गोपनीयतेचे नुकसान आणि रेकॉर्ड केलेल्या फुटेजचा गैरवापर यांचा समावेश होतो. म्हणून, सक्रिय राहणे आणि ही उपकरणे ओळखणे शिकणे प्रवाशांना संभाव्य हानीपासून स्वतःचे संरक्षण करण्यास मदत करू शकते.
हेही वाचा - कोईम्बतूरमधील AI Startup ने 140 कर्मचार्यांना दिला 14 कोटींचा बोनस, 2030 पर्यंत 'हे' लक्ष्य
घड्याळं, स्मोक डिटेक्टर, यूएसबी चार्जर्स, सजावटीच्या वस्तू यांपैकी कशातही कॅमेरे लपवलेले असू शकतात. त्यामुळे ते सहज दिसत नाहीत. या कॅमेऱ्यांचा वापर करून मिळवलेल्या फुटेजचा गैरवापर केला जाऊ शकतो. प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. म्हणून असे कॅमेरे आहेत का, हे आधीच तपासायला हवं. खोलीत गेल्यावर काही विचित्र दिसतंय का ते पाहावं. काही वेळा आरसेदेखील टू-वे असू शकतात. ते शोधण्यासाठी काचेवर बोट चिकटवावं. बोट आणि प्रतिबिंब यात अजिबात अंतर नसलं, तर तो आरसा टू-वे असू शकतो. सतत प्रवास करणाऱ्यांना छुपे कॅमेरे शोधणारे डिटेक्टर डिव्हाइसही सोबत बाळगण्यास हरकत नाही. फोनद्वारे हे कॅमेरे कसे शोधता येतील, ते पाहूया.
इन्फ्रारेड लाइट्स
बऱ्याचशा हिडन कॅमेऱ्यांमधून इन्फ्रारेड लाइट्स बाहेर पडत असतात. ते मानवी डोळ्यांना दिसत नाहीत. मात्र, स्मार्टफोन कॅमेऱ्यांद्वारे ते ओळखता येऊ शकतात. इन्फ्रारेड लाइट्सचा उगम शोधायचा असला, तर खोलीतले दिवे बंद करा किंवा मंद करा. स्मार्टफोन कॅमेरा ओपन करा. हळूहळू तो कॅमेरा हिडन कॅमेरे असू शकतील अशा संभाव्य ठिकाणी पॅन करा... फिरवा. एखाद्या ठिकाणी लपवलेला कॅमेरा असला, तर स्मार्टफोन कॅमेरा त्यातला इन्फ्रारेड लाइट टिपेल आणि स्क्रीनवर छोटा आणि पल्सिंग डॉट दिसेल. असे सिग्नल मिळाले, तर तिथे कॅमेरा असण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणाचा नीट शोध घ्या.
फ्लॅशलाइट
फोनचा फ्लॅशलाइट वापरून लपवलेला कॅमेरा शोधता येऊ शकतो. कॅमेरे कितीही हुशारीने लपवलेले असले, तरी त्यांच्या लेन्सेस प्रकाश परावर्तित करतात. असे रिफ्लेक्टिव्ह पृष्ठभाग आहेत का हे तपासण्यासाठी खोलीतले लाइट्स बंद करा. फोनचा फ्लॅशलाइट सुरू करा. कॅमेरा कुठे लपवलेला असू शकतो अशा ठिकाणी तो फ्लॅशलाइट फिरवा. त्यातून एखाद्या ठिकाणी लेन्ससारखा काही छोटा पृष्ठभाग दिसतोय का ते पाहा. काही संशयास्पद दिसल्यास ती जागा बारकाईने तपासा.
वाय-फाय नेटवर्क्स
अनेक वायरलेस हिडन कॅमेरे वाय-फाय नेटवर्क्सना जोडलेले असतात. कारण, ते फुटेज ट्रान्स्मिट करत असतात. त्यामुळे हॉटेलचं वाय-फाय नेटवर्क स्कॅन करून तुम्ही अज्ञात उपकरणांचा शोध लावू शकता. त्यासाठी आपल्या फोनची वाय-फाय सेटिंग्ज उघडा. कनेक्टेड डिव्हाइसेस पाहा. काही विचित्र डिव्हाइस नेम्स दिसतात का ते पाहा. अशी नावं नंबर्स, सिम्बॉल्स किंवा आयपी कॅमेरा, कॅमेरा अशा जेनेरिक नावांनी दिसतात. रूममधल्या कनेक्टेड डिव्हाइसेसचा शोध घेण्यासाठी ब्लूटूथ स्कॅनिंगही करता येऊ शकतं. संशयास्पद डिव्हाइस आढळल्यास हॉटेल मॅनेजमेंटला त्याची माहिती द्या.
हेही वाचा - Viral Video : साप चावल्यावर किती विष सोडतो? नेटिझन्स म्हणाले, अरे बापरे.. मग काय वाचेल माणूस!
कॅमेरा डिटेक्शन अॅप्स
अँड्रॉइड आणि अॅपलसाठी अनेक अशी अॅप्स विकसित करण्यात आली आहेत, की जी हिडन कॅमेरे शोधून देतात. ही अॅप्स फोनचा कॅमेरा आणि सेन्सर वापरून संभाव्य हिडन डिव्हाइसेस शोधतात. ती अॅप्स मॅग्नेटिक फिल्ड्स, इन्फ्रारेड लाइट्स, विचित्र सिग्नल्सचा शोध घेतात. अशा अॅप्सचा उपयोग केल्यास हिडन कॅमेरे शोधता येऊ शकतात.