Thursday, July 17, 2025 03:04:53 AM

शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरच्या चंदगडमधून जावा; आमदार शिवाजी पाटील यांची मागणी

शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरच्या चंदगडमधून जावा अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली आहे. महामार्ग आमच्या मतदारसंघातून गेला तर विकास होईल असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरच्या चंदगडमधून जावा आमदार शिवाजी पाटील यांची मागणी

मुंबई: शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरच्या चंदगडमधून जावा अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली आहे. महामार्ग आमच्या मतदारसंघातून गेला तर विकास होईल असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. तसेच  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांनी इच्छा व्यक्त केली. 

शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण तापलं असून कोल्हापुरातील अनेक आमदारांनी या शक्तिपीठ महामार्गाचा विरोध दर्शवला आहे असं असताना चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून शक्तिपीठ महामार्ग हा आमच्या मतदारसंघातून जावा अशी इच्छा व्यक्त केली.

दरम्यान सांगलीत 'शक्तिपीठ'विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. हाती शस्त्र घेऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही असा निर्धार महेश खराडे यांनी व्यक्त केला आहे. गुन्हे दाखल करा, तुरुंगात घाला असेही त्यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : मनसे विरोधात व्यापारी संघटना आक्रमक; व्यापारी संघटनांकडून मीरा-भाईंदरमध्ये बंदची हाक

शक्तिपीठ महामार्ग आंदोलन मोडीत काढायचे सरकारचे षडयंत्र चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज, शहिद भगतसिंगांचे वारसदार आहोत. गुन्हे दाखल करा, तुरुंगात टाका प्रसंगी हातात शस्त्र घेवू, नक्षलवादी होऊ, मात्र रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढू आणि जिंकू असा विश्वास स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी व्यक्त केला. यासाठी गोळ्या झेलायचीही आमची तयारी आहे. गुन्हे दाखल करा, तुरुंगात टाका आम्ही कशालाही भीक घालणार नाही. जीवात जीव असेपर्यंत आम्ही लढू आणि जिंकू असा निर्धार खराडे यांनी व्यक्त केला.  
 


सम्बन्धित सामग्री