पिंपरी चिंचवड : मध्यरात्री तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली. पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकरवाडीतील घटना आहे. धारदार शस्त्राने 18 वर्षीय तरुणीवर सपासप वार करण्यात आले. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील कृष्णाई नगर येथे रात्री धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत 18 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुचाकी वाहनावर हेल्मेट घालून आलेल्या दोन आरोपींनी त्या तरुणीवर भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करत खून केला आहे. खून करण्यासाठी आलेले आरोपी दुचाकी वाहनावर कृष्णाई नगर परिसरात फिरत असतानाची दृश्य जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या हाती लागली आहेत.
हेही वाचा : Maharashtra SSC Board Result Date 2025: दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार; 'या' संकेतस्थळावर पाहू शकता निकाल
मध्यरात्री भर रस्त्यात तरुणीवर धारदार शस्त्राने सपासप वार करत अज्ञात आरोपींनी तरुणीचा खून केला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी येथे एका अठरा वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करत निर्गुण हत्या केली आहे.
वाल्हेकरवाडी येथील कृष्णाई नगर येथे रात्रीच्या वेळी धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत 18 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आली आहे. भररस्त्यात दुचाकीवरुन हेल्मेट घालून आलेल्या दोन आरोपींनी तरुणीवर वार केले आहेत. धारदार शस्त्राने तरुणीवर सपासप वार करण्यात आले. यातच तरुणीचा मृत्यू झाला. खून करण्यासाठी दुचाकीवरुन आलेले आरोपी कृष्णाई नगर परिसरात फिरत असताना दिसून आले. या घटनेने पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.