WhatsApp युजर्सना मोठा झटका! एका मेसेजसाठी ‘इतका’ चार्ज, 1 ऑक्टोबरपासून खिशाला कात्री लागणार

व्हॉट्सॲप युजर्ससाठी अत्यंत महत्त्वाची आणि खिशाला कात्री लावणारी बातमी सध्या समोर आलेली आहे. आता मेसेज करणं महागणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

WhatsApp युजर्सना मोठा झटका! एका मेसेजसाठी ‘इतका’ चार्ज, 1 ऑक्टोबरपासून खिशाला कात्री लागणार

व्हॉट्सॲप युजर्ससाठी अत्यंत महत्त्वाची आणि खिशाला कात्री लावणारी बातमी सध्या समोर आलेली आहे. आता मेसेज करणं महागणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. फक्त एका मेसेजसाठी देखील पैसे मोजावे लागणार असल्याने नेमका हा नवा नियम कोणासाठी लागू होणार आहे तसेच कधीपासून लागू होणार आणि सर्वसामान्य युजर्सच्या खिशावर याचा खरंच परिणाम होणार का? जाणून घ्या या बातमीमागचं संपूर्ण सत्य.

मोफत WhatsApp बंद होणार?
व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार, अशी बातमी समोर आल्यानंतर अनेक युजर्सची चिंता वाढली आहे. मात्र सर्वसामान्य व्हॉट्सॲप वापरर्त्यांना घाबरण्याची जराही गरज नाही. कारण 1 ऑक्टोबरपासून लागू होत असलेले हे नवे शुल्क फक्त मोठ्या कंपन्या तसेच कॉर्पोरेट्सच्या व्हॉट्सॲपवर बिजनेस सेवेसाठी असणार आहेत.

हेही वाचा-फोनचा वापर आपण करायचा, फोनने आपला वापर नाही! Digital Detox म्हणजे नेमकं काय?

मेटाने खरं तर WhatsApp Business Platform साठी हे नवे दर जाहीर केले आहे. त्यानुसार, व्यावसायिक कंपन्यांकडून आता ग्राहकांना पाठवण्यात येणाऱ्या काही मेसेजवर प्रति मेसेज शुल्क आकारलं जाईल. या बदलात थेट परिणाम हा बंका, ई-कॉर्मस कंपन्या, मोठे स्टार्टअप्स आणि मोठ्या प्रमाणावर ग्राहकांशी व्हॉट्सॲपवरुनच संपर्क करत असलेल्या व्यवसायांवर होणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांना बँकेकडून बॅलन्स अलर्ड, ऑनलाइन शॉपिंगची डिलिव्हरी माहिती, लॉगिन ओटीपी किंवा अनेक ऑर्डर अपडेट मिळतात, असे मेसेज पाठवण्यासाठी संबंधित कंपन्या या व्हॉट्सॲपला शुल्क द्यावं लागणार आहे. ग्राहकांकडून मात्र या मेसेजसाठी कोणतेही पैसे घेतले जाणार नाहीत.

हेही वाचा-नवरात्रौत्सव, दसरा…ऑक्टोबर महिन्यात इतक्या सार्वजनिक सुट्ट्या; RBI कडून यादी जाहीर, ‘या’ 12 दिवशी बँका राहणार बंद

ऑक्टोबरपासून काही Utility आणि Service Messagesसाठीचे सुधारित दर लागू होतील. प्रमोशन, ऑफर, डिस्काउंटसारख्या मार्केटिंग मॅजेसाठी कंपन्यांना शुल्क द्यावं लागणार आहे. जीएसटी धरुन काही प्रकारच्या मेसेजचा खर्च हा साधारण 14 पैशांपर्यंत जाऊ शकतो. दरम्यान, प्रत्येक व्यावसायिक फोन नंबरला ग्राहक सेवा तसेच सहाय्यासाठी दरमहा 1,000 मेसेजपर्यंत मोफत मर्यादा दिली जाणार आहे. जेव्हा ही मर्यादा संपेल तेव्हा अतिरिक्त मेसेजसाठी शुल्क लागू होतील.

सामान्य युजर्सना आर्थिक फटका?
वैयक्तिक व्हॉट्सॲप अकाउंटवर या नियमाचा कोणताही आर्थिक परिणाम होणार नाही. तसेच, 30 सप्टेंबरपर्यंत पेमेंट पद्धत जोडली नाही, तर संबंधित कंपन्यांना 1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक मेसेज पाठवण्यात अडचणी येऊ शकतात.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number