नवी दिल्ली : भारतात लग्न म्हटलं की संगीत आणि नृत्य आलंच. प्रत्येक लग्नात याचं कमी अधिक प्रमाण असतं. पण दिल्लीतील एका लग्नात नवरदेवाने एका प्रसिद्ध बॉलिवुड गाण्यावर केलेला डान्स त्याला चांगलाच भोवल्याचं पाहायला मिळालं.
नवरदेवाची वरात नवी दिल्लीतील लग्न सोहळ्याच्या ठिकाणी पोहचली. यावेळी नवरदेवाच्या मित्रांनी त्याला वरातीत वाजत असलेल्या बॉलिवूड चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर डान्स करण्याचा आग्रह केला. नवरदेवही मित्रांबरोबर नाचू लागला. पण ही कृती नवरीच्या वडिलांना आवडली नाही. नवरदेवाचं वागणं असभ्य असल्याची टीका करत मुलीच्या वडीलांनी लग्न तिथंच थांबवलं. मीडिया रिपोर्टनुसार, लग्न मोडल्यानंतरही वडिलांचा राग संपला नाही, त्यांनी त्यांच्या मुलीला नवरदेवाच्या कुटुंबाशी कोणतेही संबंध ठेवण्यास देखील मनाई केली आहे.
हेही वाचा - Nashik-Gujarat Highway Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर भाविकांनी भरलेल्या बसला भीषण अपघात! 7 जणांचा मृत्यू
नवरदेव आणि त्यांच्या मित्रांनी लग्नात ‘चोली के पीछे क्या है’ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स केला. पण नवरीच्या वडिलांना हे न पसंत पडल्याने त्यांनी आपल्या मुलीचं लग्न या मुलाशी करण्यास नकार दिला. नवरदेव व त्याच्या इतर नातेवाईकांनी खूप समजावल्यानंतरही मुलीच्या वडिलांनी चक्क लग्नच मोडल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर नवरदेवाच्या कृतीमुळे त्यांच्या कौटुंबिक मूल्यांचा अपमान झाल्याचं सांगत त्यांनी लग्नही मोडून टाकलं.
हेही वाचा - FDI In Insurance : शंभर टक्के FDI! विमा क्षेत्रात 100 टक्के परदेशी गुंतवणुकीस मंजुरी
वधू रडू लागली
हा सगळा प्रकार पाहूण वधूला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. वर तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता की हे फक्त एक गंमत म्हणून केलेले नृत्य होते. लग्न रद्द झाल्यानंतरही वधूचे वडील संतापले होते. त्यांनी आपल्या मुलीला वराच्या कुटुंबाशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत अशा कडक सूचना दिल्या. आनंदोत्सव सुरू असताना हे लग्न अचानक मोडल्यामुळे दोन्ही कुटुंबांसाठी दुःखद वातावरण बनले.