मुंबईकरांचा दिवस हा लोकलनेच सुरू होतो आणि लोकलनेच संपतो. दररोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने लोकलमध्ये अनेकदा वाद, हाणामारी आणि धक्काबुक्कीच्या घटना घडतात. अशातच सध्या मुंबई लोकलमधील वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिलांमध्ये मराठी भाषेवरून जोरदार वाद झाल्याचे दिसत आहे.
मागील काही महिन्यांपासून राज्यात अनेक ठिकाणी मराठी-हिंदी भाषेवरून वाद झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक परप्रांतीय भाजी विक्रेते आणि रिक्षाचालकांनी रोजच्या व्यवहारापुरते मराठी शिकून घेतले आहे. मात्र, लोकलमधील हा प्रकार वेगळा आहे.
“Speak Marathi in Maharashtra” — a language argument turns ugly inside a train. A group of women can be heard arguing with a passenger from UP over which language should be spoken. The argument quickly escalates, with the women telling her to speak Marathi or go back to UP.… pic.twitter.com/yRjfWMouEw — Gems Of Railway (@GemsOfRailway) September 26, 2026
एक्स (X) वर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये, दोन महिला लोकलमध्ये प्रवास करताना कोणत्या भाषेत बोलावे यावरून वाद घालताना दिसत आहेत. वाद विकोपाला गेल्यानंतर त्यातील एक महिला दुसऱ्या महिलेला “मराठी बोला किंवा उत्तर प्रदेशला परत जा” असे म्हणताना ऐकू येते.
व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महाराष्ट्रीयन महिला म्हणते, “जर तुम्हाला मराठी बोलता येत नसेल, तर तुमच्या यूपीला परत जा. इथे फक्त आमचीच भाषा बोलली जाईल.” त्यावर उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगणारी दुसरी महिला, “आम्ही का जायचे? तुम्ही यूपीला जा” असे प्रत्युत्तर देत आहे. वाद वाढत असताना दोन्ही महिला एकमेकींना शिवीगाळ करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे