छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका वयोवृद्ध महिलेच्या हातातील पैसे असलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न करताना तिला रस्त्यावर फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध महिलेच्या पिशवीत महिन्याच्या खर्चासाठी मिळालेली 4 हजार रुपयांची पेन्शन होती. लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला एक तरुण मागून येतो आणि तिच्या हातातील पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पैसे वाचवण्यासाठी महिला प्रतिकार करते. या झटापटीत ती रस्त्यावर पडते. त्यानंतर तरुण पिशवी हिसकावून तेथून पळून जातो.
Maharashtra: A minor allegedly pushed an elderly woman to the ground while attempting to snatch her bag containing ₹4,000 in pension money in Chhatrapati Sambhajinagar. The incident was captured on CCTV. https://t.co/hfSOv87O3q — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 26, 2026
या घटनेत वृद्ध महिला रस्त्यावर पडल्याने जखमी झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ती मदतीसाठी आजूबाजूच्या लोकांना साद घालत असल्याचेही दिसते. दरम्यान, स्थानिकांनी संबंधित तरुणाला पकडून आणल्याची माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकाराचे दृश्य परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. वयोवृद्ध महिलेबाबत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-