SBI मधून 1 नोव्हेंबरपासून पैसे काढता येणार नाहीत? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजचे सत्य काय?

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते आणि बाजारात खरेदीसाठी आर्थिक व्यवहारांची गती वाढलेली असते. अशा वेळेस पैसे काढता येणार नसल्याचा मेसेज व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.

SBI मधून 1 नोव्हेंबरपासून पैसे काढता येणार नाहीत? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजचे सत्य काय?
SBI

SBI Money Withdrawal Viral Message Fake News: आज 1 नोव्हेंबर 2026 पासून गॅस, दूध आणि दह्यासह अनेक अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसला असतानाच, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या खातेदारांमध्ये एका व्हायरल मेसेजमुळे तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले. 1 नोव्हेंबर 2026 पासून बँकिंग नियमांमध्ये अचानक बदल करण्यात आले असून ग्राहकांना पुढील 24 तासांत एटीएम (ATM) किंवा बँकेच्या शाखेतून पैसे काढता येणार नाहीत आणि व्यवहारांवर कठोर निर्बंध लादले गेले आहेत, असा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दिवाळीचा सण ऐन तोंडावर असताना पैसे काढण्यावरच बंदी आल्याची अफवा उठल्याने अनेक खातेदारांची झोप उडाली आणि घाबरलेल्या नागरिकांनी तात्काळ एटीएम केंद्रांकडे धाव घेतली.

डार्क वेबवर माहिती फुटल्यामुळे तांत्रिक तपास; तिथूनच पसरली बंदीची खोटी अफवा
व्हायरल झालेल्या या मेसेजमागे बँकेतील एक तांत्रिक घटना आणि सुरक्षेचा तपास कारणीभूत ठरला. काही दिवसांपूर्वी स्टेट बँकेच्या 3897 ग्राहकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर आढळून आल्याच्या बातमीला स्वतः बँकेने दुजोरा दिला होता. या गंभीर घटनेची दखल घेत सायबर सुरक्षेची नोडल संस्था असलेल्या CERT-In मार्फत सखोल चौकशी सुरू करण्यात आली. तपास प्रक्रियेदरम्यान सायबर सुरक्षेच्या तांत्रिक प्रणालीत काही गैरवापर झाल्याचे उघडकीस आले. मात्र, या तांत्रिक सुरक्षेच्या प्रक्रियेचा विपर्यास करून काही खोडसाळ प्रवृत्तींनी थेट बँकेचे व्यवहार बंद होणार असल्याची निव्वळ अफवा सोशल मीडियावर पसरवली.

हेही वाचा – नोव्हेंबरमध्ये बँकांना किती दिवस सुट्ट्या? दिवाळीपासून छठ पूजेपर्यंत बँका कधी बंद राहणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून स्पष्टीकरण; मेसेज पूर्णपणे दिशाभूल करणारा
नागरिकांमधील वाढती घबराट आणि सोशल मीडियावरील गोंधळ पाहून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) तात्काळ अधिकृत माहिती जारी केली. 1 नोव्हेंबरपासून बँकेतून पैसे काढण्यावर बंदी घातल्याचा व्हायरल मेसेज हा पूर्णपणे खोटा, बाष्कळ आणि दिशाभूल करणारा असल्याचे शासनाने स्पष्ट केले. स्टेट बँकेचे सर्व ग्राहक आपले नियमित व्यवहार 100 टक्के सुरक्षितपणे करू शकतात आणि 1 नोव्हेंबरनंतरही बँकेतील कोणतीही सेवा बाधित होणार नसून सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट शब्दांत सांगितले.

दिवाळीच्या खरेदीच्या काळात अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते आणि बाजारात खरेदीसाठी आर्थिक व्यवहारांची गती वाढलेली असते. अशा मोक्याच्या वेळी पसरलेल्या या खोट्या बातमीमुळे नागरिकांमध्ये काही काळ गोंधळ उडाला असला, तरी आता वस्तुस्थिती समोर आल्याने दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी आणि SBI खातेदारांनी सोशल मीडियावर येणाऱ्या अशा कोणत्याही अफवांवर किंवा तथ्यहीन मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये आणि बँकेच्या अधिकृत माहितीवरच भरवसा ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – नोव्हेंबरचा पहिला दिवस ठरला महत्त्वाचा! देशभरात लागू झाले नवे नियम, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number