थायलंड: दरवर्षी, जगभरातील लाखो पर्यटक थायलंडच्या फुकेत येथील टायगर किंगडमला भेट देतात. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्ही वाघाला आमनेसामने पाहू शकता. इतकंच नाही, तर येथे तुम्ही वाघाला हातही लावू शकता तसेच फोटोही काढू शकता. अशातच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिथल्या वाघाने एका भारतीय व्यक्तीवर हल्ला केला आहे.
हेही वाचा: सासरा सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणेंची पोलीस कोठडी आज संपणार
नेमकं प्रकरण काय?
सिद्धार्थ शुक्ला नावाच्या पर्यटकाने 29 मे रोजी एक्सवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. काही वेळातच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि यावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ही घटना इतकी भयानक होती की व्हिडिओमधील त्या व्यक्तीच्या किंकाळ्या ऐकणाऱ्यांच्या पाठीचा थरकाप उडवायला पुरेशीर होती. दरम्यान, सिद्धार्थ शुक्लाच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया आणि काळजी व्यक्त केली आहे. यांना उत्तर देत सिद्धार्थ म्हणाले की, 'ज्या व्यक्तीवर वाघाने हल्ला केला आहे, तो किरकोळ जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत'.