Thursday, July 17, 2025 02:46:18 AM

14 बंकर-बस्टर बॉम्ब, 25 मिनिटे सुरू होते 'ऑपरेशन हॅमर'; इराणच्या 3 अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचा मोठा खुलासा

अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन प्रमुख अणु तळांवर हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी याला यशस्वी हल्ला म्हटले आहे.

14 बंकर-बस्टर बॉम्ब 25 मिनिटे सुरू होते ऑपरेशन हॅमर इराणच्या 3 अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचा मोठा खुलासा
Edited Image

वाशिंग्टन: इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन प्रमुख अणु तळांवर हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी याला यशस्वी हल्ला म्हटले आहे. या हल्ल्यानंतर, अमेरिकेकडून एक मोठे विधान आले आहे.

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी रविवारी इराणच्या अणु तळांवर अमेरिकेच्या हल्ल्यांना 'अविश्वसनीय आणि जबरदस्त यश' असे म्हटले आहे. 
त्यांनी सांगितले की, अमेरिकेने तिहेरी हल्ल्यांनी तेहरानच्या अणु महत्त्वाकांक्षा नष्ट केल्या. अमेरिकेचे उच्च लष्करी अधिकारी जनरल डॅन केन म्हणाले की अमेरिकेने या कारवाईत 14 बंकर-बस्टर बॉम्ब, दोन डझनहून अधिक टोमाहॉक क्षेपणास्त्रे आणि 125 हून अधिक लष्करी विमानांचा वापर केला. हल्ल्यांचा उद्देश शासन बदलणे नव्हता. तर इराणची अणु महत्त्वाकांक्षा नष्ट करणे होता. हल्ल्यांचे लक्ष्य इराणी सैनिक किंवा लोक नव्हते.

हेही वाचा - बी-2 स्टेल्थ बॉम्बर्स काय असतात? यांचाच वापर करून अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांना लक्ष्य केले

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सांगितलं की, काल रात्री, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आदेशानुसार, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणच्या अणुकार्यक्रमाला नष्ट करण्यासाठी किंवा गंभीरपणे कमकुवत करण्यासाठी फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन इराणी अणुप्रकल्पांवर मध्यरात्री अचूक हल्ला केला. हे एक अविश्वसनीय आणि जबरदस्त यश होते. आमच्या कमांडर-इन-चीफकडून आम्हाला मिळालेला आदेश केंद्रित होता, तो शक्तिशाली होता आणि आम्ही इराणी अणुप्रकल्प नष्ट केला. 

हेही वाचा - अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

दरम्यान, पेंटागॉनने हल्ल्याबाबत एक नकाशा जारी केला आहे. पेंटागॉनने हा नकाशा जारी करून मोहिमेची माहिती दिली. अमेरिकेने दावा केला की त्यांच्या कारवाईमुळे इराणच्या तीन अणुप्रकल्पांना 'अत्यंत नुकसान' झाले. हेगसेथ यांनी सांगितले की, इराणच्या सुरक्षा यंत्रणेला चकमा देण्यासाठी छद्मवेषी युक्त्या वापरण्यात आल्या, ज्यामुळे त्यांच्या हवाई क्षेपणास्त्र यंत्रणेच्या नजरेत न येता कारवाई करण्यास मदत झाली.
 


सम्बन्धित सामग्री