तिबेटमध्ये 7.0 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! 16 जणांचा मृत्यू, 54 जण जखमी; 339 घरे ढिगाऱ्याखाली

तिबेटमध्ये गुरुवार, 22 ऑक्टोबर रोजी 10 किमी खोलीवर 7 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला.

तिबेटमध्ये 7.0 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! 16 जणांचा मृत्यू, 54 जण जखमी; 339 घरे ढिगाऱ्याखाली
earthquake hits tibet

तिबेट : तिबेटमध्ये गुरुवार, 22 ऑक्टोबर रोजी 10 किमी खोलीवर 7 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे उत्तरेकडील नागचू (Nagqu) शहरात किमान 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 54 जण जखमी झाले असून शेकडो घरे कोसळल्याची माहिती समोर येत आहे. नागकू मीडिया कार्यालयाने शहर सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, किमान 339 घरे आणि 20 पशुधन निवारे कोसळल्यानंतर शोध आणि बचावकार्य सुरू होते. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री 10.33 वाजता भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेटच्या उत्तरेकडील, कमी लोकवस्ती असलेल्या आणि अधिक उंचीवरील भागात, नागकूच्या पूर्व-ईशान्य दिशेला 191 किमी (119 मैल) अंतरावर होता. या संस्थेच्या अंदाजानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 18 किमी (11 मैल) खोलीवर होता. नागकू हे ठिकाण तिबेटची राजधानी ल्हासाच्या उत्तरेला 300 किमी (186 मैल) पेक्षा जास्त अंतरावर स्थित आहे.

हेही वाचा : लंडनमध्ये मराठीचा डंका! 14 वर्षांचा फोटोग्राफीचा प्रवास थेट ऑस्करपर्यंत; मराठीतून भाषण देणारा फोटोग्राफर कोण?

भूकंपामुळे दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या. ज्यामुळे स्थानिक प्रशासनाला राष्ट्रीय महामार्ग 317 चा काही भाग बंद करावा लागला. एपी (AP) वृत्तसंस्थेनुसार, चिनी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने दिलेल्या माहितीनुसार, ढिगारा हटवण्याचे काम सुरू असताना केवळ आपत्कालीन, बचाव आणि अधिकृत मदत वाहनांनाच तेथून जाण्याची परवानगी देण्यात आली होती. भूकंपग्रस्त भागात पुढील तीन दिवसांत अधूनमधून बर्फवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येऊ शकतात. या भागातील काही ठिकाणी दळणवळण आणि संपर्क व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तर स्थानिक रेल्वे प्रशासनाने बाधित भागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्या थांबवण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना केल्या आहेत. या भागातील गेल्या पाच वर्षांतील सर्वात मोठा भूकंप असल्याचे सांगितले जात आहे.

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान | Maharashtra Teacher and Graduate Constituency Election

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number