Sunday, November 16, 2025 06:05:10 PM

Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानच्या खंडुद भागात 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप

हा भूकंप आग्नेय अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेजवळील खंडुदपासून सुमारे 46 किमी अंतरावर सायंकाळी 5:45 वाजता नोंदवला गेला.

earthquake in afghanistan अफगाणिस्तानच्या खंडुद भागात 56 रिश्टर स्केलचा भूकंप

Earthquake In Afghanistan: शुक्रवारी संध्याकाळी अफगाणिस्तानच्या खंडुद भागात 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हा भूकंप आग्नेय अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेजवळील खंडुदपासून सुमारे 46 किमी अंतरावर सायंकाळी 5:45 वाजता नोंदवला गेला. त्याचे केंद्र 10 किलोमीटर खोलीवर होते. सुरुवातीच्या अहवालांनुसार, या भूकंपामुळे तात्काळ कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. तथापि, रहिवाशांमध्ये गेल्या महिन्यात आलेल्या विनाशकारी भूकंपाची आठवण ताजी असल्यामुळे घबराट पसरली आहे.

दरम्यान, 4 सप्टेंबर रोजी आग्नेय अफगाणिस्तानमध्ये 6.2 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप आला होता. चार दिवसांत त्याच प्रदेशात बसलेला हा तिसरा भूकंप होता. या विनाशकारी घटनेत 2,200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक गावे जमीनदोस्त झाली होती. तथापी, माती व लाकडी घरांच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकले.

हेही वाचा - Pakistan Afghanistan Conflict: 'तालिबानशी शांतता चर्चेसाठी तयार...'; शाहबाज शरीफ यांची मोठी घोषणा

संयुक्त राष्ट्रांनी 9 सप्टेंबरला पूर्व अफगाणिस्तानातील विनाशकारी भूकंपामुळे प्रभावित सुमारे अर्धा दशलक्ष लोकांना मदत करण्यासाठी आपत्कालीन निधीसाठी आवाहन केले. या निधीच्या मदतीने कुनार, लगमान आणि नांगरहार प्रांतातील 457,000 लोकांना चार महिन्यांच्या आपत्कालीन प्रतिसाद योजनेअंतर्गत मदत करण्याची योजना आहे. 

हेही वाचा - H-1B Visa: एच-1बी शुल्कवाढीप्रकरणी ट्रम्प सरकारविरोधात खटला, यूएस चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेने केली कारवाई

अफगाणिस्तान हे भूकंपप्रवण क्षेत्र आहे कारण येथे भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्स एकत्र येतात. या टक्करमुळे पृथ्वीचा कवच दुमडतो आणि भूकंप निर्माण होतो. हिंदू कुश पर्वतरांगा विशेषतः संवेदनशील असून, उत्तर अफगाणिस्तानमधील पामीर-हिंदू कुश प्रदेशात अनेकदा तीव्र भूकंप घडतात. तथापी आज झालेल्या या भूकंपामुळे सध्या कोणतीही तातडीची आपत्ती नोंदलेली नसली तरी, रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री