Statue Of Liberty Viral Video : सोसाट्याचा वारा अन् बघता बघता ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ कोसळली, घटनेचा भयंकर व्हिडीओ समोर

ब्राझील ग्वायबा येथील हवान स्टोअरमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती पाडल्याची व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Statue Of Liberty Viral Video : सोसाट्याचा वारा अन् बघता बघता ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ कोसळली, घटनेचा भयंकर व्हिडीओ समोर

ब्राझील ग्वायबा येथील हवान स्टोअरमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती पाडल्याची व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 15 डिसेंबर रोजी दक्षिण ब्राझीलमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हवानच्या मेगास्टोअरबाहेरील 24 मीटर उंचीची स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती हळूहळू पार्किंगमध्ये पुढे झुकली आणि कोसळली. ज्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. हवानच्या मेगास्टोअरबाहेरील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची 24 मीटर उंचीची प्रतिकृती 2020 मध्ये अभियांत्रिकी प्रमाणपत्रासह स्थापित करण्यात आली होती.

हेही वाचा- Donald Trump FIFA Peace Prize : नोबेल नाही पण फिफाने पूर्ण केली इच्छा! ..आणि एकदाचा ट्रम्प यांना शांतता पुरस्कार मिळाला

ग्वायबाचे महापौर मार्सेलो मरनाटा यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, डेफेसा सिव्हिलच्या तीव्र हवामान सूचनांनंतर  80-90 किमी/ताशी वेगाने वारे वाहत होते. हवान कर्मचाऱ्यांनी तात्काळ वाहने हलविण्यास सुरुवात केली ज्यामुळे कोणतेही नुकसान किंवा दुखापत झाली नाही. यापुर्वी 2021 मध्ये कॅपाओ दा कॅनोआ येथे झालेल्या अशाच एका घटनेत 70 ते 80 किमी/ताशी वेगाने आलेल्या वादळात आणखी एक प्रतिकृती कोसळली होती. दरम्यान हवनने ब्राझील ग्वायबा येथील हवान स्टोअरमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती पाडल्यानंतर दुरुस्तीसाठी अभियंते पाठवले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number