Sunday, January 25, 2026 08:33:24 AM

Donald Trump FIFA Peace Prize : नोबेल नाही पण फिफाने पूर्ण केली इच्छा! ..आणि एकदाचा ट्रम्प यांना शांतता पुरस्कार मिळाला

हा पुरस्कार फिफाचा (FIFA) पहिला शांतता पुरस्कार आहे. मात्र, या पुरस्काराची निवड नेमकी कशी होते किंवा त्यासाठी पात्रता, निवड प्रक्रिया काय असते, याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

donald trump fifa peace prize  नोबेल नाही पण फिफाने पूर्ण केली इच्छा आणि एकदाचा ट्रम्प यांना शांतता पुरस्कार मिळाला

Donald Trump FIFA Peace Prize : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पारितोषिकासाठी (Nobel Prize) गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करत होते. ते अनेक ठिकाणी कार्यक्रम आणि विविध व्यासपीठांवर आपण जागतिक पातळीवर युद्धे कशी थांबवली आणि याबद्दल नोबेल पुरस्कारासाठी आपणच कशी योग्य व्यक्ती आहोत, ते पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. ट्रम्प यांनी अनेकदा नोबेल पारितोषिकाची आपली इच्छाही बोलून दाखवली होती, पण त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही. जागतिक पातळीवरील काही देशांच्या नेत्यांनी त्यांना यासाठी पाठिंबाही दिला होता. मात्र, नोबल समितीने हा 'ट्रम्प हट्ट' फारसा गांभीर्याने घेतला नाही. तर, भारतातल्या आणि अनेक ठिकाणच्या सामान्य लोकांनी याबद्दल ट्रम्प यांची सोशल मीडियावर तुफान खिल्लीही उडवली.

FIFA कडून नवीन शांतता पुरस्कार प्रदान
नोबेल शांतता पुरस्कारापासून वंचित राहिल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांना फिफाने (FIFA) शांतता पुरस्कार (Donald Trump Peace Prize) प्रदान केला आहे. हा नवीन फिफा शांतता पुरस्कार (New FIFA Peace Prize) त्यांना शुक्रवारी 2026 च्या विश्वचषक स्पर्धेच्या (World Cup) ड्रॉमध्ये प्रदान करण्यात आला आहे. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो (Gianni Infantino) यांनी ट्रम्प यांना हा पुरस्कार दिला.

पुरस्कार निवडीबद्दल अजूनही रहस्य
हा पुरस्कार फिफाचा (FIFA) पहिला शांतता पुरस्कार आहे. मात्र, या पुरस्काराची निवड नेमकी कशी होते किंवा त्यासाठी निवड प्रक्रिया काय असते, पुरस्कार दिल्या जाणाऱ्या व्यक्तीची पात्रता याबाबत फिफाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

ट्रम्प यांची पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "हा खरोखर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सन्मानांपैकी एक आहे. पुरस्कारापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आम्ही लाखो लोकांचे जीव वाचवले. काँगो (Congo) हे याचे एक उदाहरण आहे." तसेच, "आम्ही भारत-पाकिस्तान संघर्षासह (India-Pakistan Conflict) अनेक संघर्ष रोखण्यास देखील मदत केली," असे ट्रम्प यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा - Putin in India: भारत दौऱ्यावर पुतीन यांचे विशेष विमान; त्यावरील 'Poccия' या शब्दाचा अर्थ काय?

फिफा प्रमुखांकडून ट्रम्प यांचे कौतुक
फिफाचे प्रमुख इन्फँटिनो (Infantino) यांनी गाझा युद्धबंदीबाबत (Gaza Ceasefire) ट्रम्प यांच्या भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले, "ट्रम्प हे नोबेल पुरस्कारास पात्र होते, पण त्यांना तो मिळाला नाही. आता फिफाच्या पहिल्या जागतिक शांतता पुरस्काराचे (First Global Peace Prize) विजेते ट्रम्प ठरले आहेत." काहींनी या निर्णयावर टीका केली असली तरी, ट्रम्प यांनी नोबेल नाही, तरी किमान फिफा शांतता पुरस्कार तरी जिंकला आहे, असे इन्फँटिनो यांनी स्पष्ट केले.

नोबेल पुरस्कार का मिळाला नाही?
ट्रम्प यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Peace Prize) न मिळण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, त्यांचे नामांकन कटऑफ तारखेनंतर आले होते. त्यांच्या ऐवजी व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो (Maria Corina Machado) यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला. यावर्षीच्या पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणारे नामांकन 1 फेब्रुवारीपूर्वी करायची होती. नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष जॉर्गेन फ्रायडनेस यांनी सांगितले की, पुरस्काराचा हा निर्णय आल्फ्रेड नोबेल यांनी व्यक्त केलेल्या इच्छा आणि संबंधित व्यक्तीच्या कार्यावर अवलंबून असतो.

हेही वाचा - Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला आणखी एक मोठा धक्का; पुतीन दौऱ्यावर असतानाच घेतला मोठा निर्णय


सम्बन्धित सामग्री