कोण हा निकिता कॅसप? आई-वडिलांची हत्या करून डोनाल्ड ट्रम्पना मारण्याचा कट; 17 वर्षीय तरुणाला अटक

ट्रम्प यांना मारण्याचा कट रचणाऱ्या 17 वर्षीय अमेरिकन तरुणाला अटक झाली आहे. त्याने त्याच्या आई-वडिलांचीही हत्या केली आहे. त्याच्या फोनमध्ये निओ-नाझी गट ऑर्डर ऑफ नाईन एन्जल्स संबंधी सामग्री मिळाली आहे.

कोण हा निकिता कॅसप? आई-वडिलांची हत्या करून डोनाल्ड ट्रम्पना मारण्याचा कट; 17 वर्षीय तरुणाला अटक

न्यूयॉर्क : अमेरिकन पोलिसांनी विस्कॉन्सिनमधील एका 17 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्यावर त्याच्या पालकांची हत्या केल्याचा आरोप आहे. या तरुणाचे नाव निकिता कॅसप आहे. तो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याचा कट रचत होता, असे समोर आले आहे. यासाठी त्याला पैशांची नितांत गरज होती, म्हणून त्याने स्वतःच्या पालकांची हत्या केली. या हत्येचा उद्देश अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्यासाठी पैसे गोळा करणे हा होता.

आरोपी तरुणाचे नाव निकिता कॅसप आहे. तो आता पोलीस कोठडीत आहे. निकिताजवळ काही लिखित कागदपत्रे आणि संदेश सापडले आहेत, जे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध हत्येच्या कट रचत असल्याचे संकेत देतात. निकिताचा कट उघड झाला आहे. निकितासोबत पोलिसांना अनेक धक्कादायक पुरावे सापडले आहेत. ट्रम्प यांना मारण्यासाठी तो कोणत्याही थराला जाण्यास तयार होता.

हेही वाचा – आई की राक्षस? 9 वर्षांच्या मुलाला 2 वर्ष घरात एकट्याला ठेवलं अन् प्रियकराकडे राहायला गेली..!

निकितावर 9 आरोप
अमेरिकेच्या वौकेशा काउंटी कोर्टाच्या म्हणण्यानुसार, निकिता कॅसप नावाच्या 17 वर्षांच्या अमेरिकन तरुणाने त्याच्या पालकांची हत्या केली. निकितावर फक्त एक-दोन नाही तर, एकूण 9 आरोप लावण्यात आले आहेत. त्याने त्याच्या पालकांची हत्या केली आणि त्यांचे मृतदेह लपवले. याव्यतिरिक्त फेडरल तपासकर्त्यांनी त्याच्यावर राष्ट्राध्यक्षांची हत्या, त्यासंबंधी कट रचणे आणि घातक शस्त्रांचा वापर करणे असे आरोप ठेवले आहेत. निकिताने तीनदा ट्रम्प यांना मारण्याचा कट रचला. यासाठी त्याने एक संपूर्ण योजना आखली आणि मोठ्या प्रमाणात विनाश घडवू शकतील अशी शस्त्रे वापरण्याचा प्रयत्न केला. 

प्रकरण कसे उघड झाले?
ही घटना 11 फेब्रुवारी रोजी घडली होती. 11 फेब्रुवारी रोजी निकिताने त्याची आई तातियाना कॅसप आणि सावत्र वडील डोनाल्ड मेयर यांची गोळ्या घालून हत्या केली. हत्येनंतर त्याने दोघांचेही मृतदेह लपवले. या हत्येबद्दल अमेरिकन पोलिसांना काहीच माहिती मिळाली नाही. सुरुवातीला पोलिसांनी त्याला त्याच्या वडिलांची एसयूव्ही म्हणजे चारचाकी चोरल्याबद्दल आणि बंदूक बाळगल्याबद्दल अटक केली होती. पण निकिताचे भयंकर कृत्य उघडकीस आल्यानंतर, पोलीसही थक्क झाले.

निकिताजवळ काय-काय सापडले?
निकिताच्या फोनमध्ये पोलिसांना 'द ऑर्डर ऑफ नाइन अँगल', हिटलरच्या नाझी विचारसरणीने प्रेरित नेटवर्कचे पुरावे सापडले. ट्रम्पची हत्या करता यावी, म्हणून निकिता बॉम्ब कसा बनवायचा, हे शिकत असल्याचे तपासात समोर आले. याशिवाय त्याच्याकडून दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित एक पत्र आणि काही छायाचित्रेही जप्त करण्यात आली आहेत.

शाळेतील मित्राने सत्य उघड केले
निकिताच्या शाळेतील मित्राने त्याच्याविरुद्ध शेरीफ कार्यालयात निवेदन दिले आहे. शेरीफ म्हणतात की, निकिता काही काळापूर्वी त्याच्या पालकांना मारण्याचा कट रचत होता. पण त्याच्याकडे बंदूक नव्हती. अशा परिस्थितीत, त्याने मित्राला सांगितले की, तो अशा व्यक्तीशी मैत्री करेल ज्याच्याकडे बंदूक आहे. त्याच्या मनात अमेरिकन सरकार आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल राग होता. ट्रम्प यांची हत्या करून अमेरिकन सरकार उलथवून टाकण्याचा त्याचा हेतू होता.

हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर

अमेरिकेत सहजपणे मिळत असलेली शस्त्रे, समाजात पालकांचे मुलांच्या हालचालींकडे लक्ष नसणे, संस्कारांचा आणि मूल्यांचा अभाव, चुकीची संगत, स्वातंत्र्याचा अतिरेक, मुलांमध्ये तरुणांमध्ये बळावत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती हे मुद्दे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. यातील बहुतांश बाबी अमेरिकन समाजमनाशी संबंधित असल्यामुळे त्यात फारशी सुधारणा होताना दिसत नाही.

हेही वाचा – रोबो आणि AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने प्रेग्नन्सी; IVF यशस्वी होऊन पहिल्या बाळाचा जन्म

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number