AI Developer Sweeping Streets: भारतीय इंजिनिअर तरुणाने रशियात मारला झाडू, कारण वाचून नेटीझन्स झाले भावूक

एकेकाळी मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज कंपनीत AI (Artificial Intelligence) डेव्हलपर म्हणून काम करणारा हा तरुण सध्या रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात रस्ते साफ करण्याचे काम करत आहे.

AI Developer Sweeping Streets: भारतीय इंजिनिअर तरुणाने रशियात मारला झाडू, कारण वाचून नेटीझन्स झाले भावूक

AI Developer Sweeping Streets: कोणतेही काम लहान नसते, कष्ट करण्याची तयारी असेल तर मार्ग सापडतोच, हे वाक्य सध्या एका 26 वर्षीय भारतीय तरुणाने सत्यात उतरवून दाखवले आहे. एकेकाळी मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज कंपनीत AI (Artificial Intelligence) डेव्हलपर म्हणून काम करणारा हा तरुण सध्या रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात रस्ते साफ करण्याचे काम करत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून भारतातील बेरोजगारी आणि तरुणांच्या जिद्दीवर चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?  

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात सध्या कामगारांची मोठी कमतरता भासत आहे. विशेषतः रस्ते सफाई आणि देखभालीसाठी स्थानिक लोक उपलब्ध नसल्याने ‘Kolomyazhskoye’ या रशियन कंपनीने भारतातून 17 कामगारांची भरती केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व 17 कामगार उच्चशिक्षित आहेत, मात्र विदेशात ते झाडू मारण्याचं काम करत आहेत. 

हेही वाचा – Sharran Srivatsaa : ‘..त्याने माझ्या गळ्यावर चाकू टेकवला; मी त्याच्याशी डील केली.. तो म्हणाला, विचित्र माणूस!’ शरण श्रीवत्स यांची थरारक स्टोरी

कोण आहे हा तरुण?

या व्हायरल व्हिडीओमधील तरुणाचे नाव मुकेश मंडल आहे. मुकेशने दिलेल्या माहितीनुसार तो एक कुशल इंजिनिअर असून त्याने मायक्रोसॉफ्टमध्ये AI डेव्हलपर म्हणून काम केले आहे. सध्या तो कडाक्याच्या थंडीत रशियातील रस्ते स्वच्छ करतो. या कामासाठी त्याला दरमहा सुमारे 1 लाख रुपये पगार मिळतो. सोबतच राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय कंपनीतर्फे केली जाते.

हेही वाचा – Ahmedabad Traffic Police VIDEO: भररस्त्यात ट्रॅफिक पोलिसाची अरेरावी! तावातावात आला अन् महिलेच्या कानशिलात लगावली; Viral Video

मुकेश मंडल व्हिडीओमध्ये अत्यंत सकारात्मक असल्याचं दिसत आहे. तो म्हणतो, ‘मी इथे भरपूर पैसे साठवण्यासाठी आलो आहे. 1-2 वर्षे हे काम करून मी पुन्हा मायदेशी परतेन. मी इंजिनिअर असलो तरी हे काम करताना मला कसलीही लाज वाटत नाही. ज्या कामातून पैसे मिळतात, ते काम छोटे असू शकत नाही.’  

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

दरम्यान, @nexta_tv या ‘एक्स’ अकाउंटवरून शेअर झालेला हा व्हिडीओ आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. काही लोकांनी भारतातील बेरोजगारीच्या भीषणतेवर चिंता व्यक्त केली आहे, तर काहींनी मुकेशच्या मेहनतीचे आणि सकारात्मक विचारांचे कौतुक केले आहे. तथापी, ‘एका AI डेव्हलपरला रस्ते झाडावे लागतात, हे पाहून डोळ्यात पाणी आले,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number