मोठी बातमी! बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या वाहनावर हल्ला; 12 जवानांचा मृत्यू

बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला केला आहे. त्याचवेळी, या स्फोटात 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

मोठी बातमी! बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या वाहनावर हल्ला; 12 जवानांचा मृत्यू
Edited Image, X /@AnalystShashank

इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सध्या पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या वाहनावर हल्ल्याची घटना समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला केला आहे. त्याचवेळी, या स्फोटात 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यासाठी बीएलएने आयईडीचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे.  

पाकिस्तानी लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक शक्तिशाली आयईडी स्फोट दिसत आहे. स्फोटानंतर पाकिस्तानी लष्कराच्या वाहनाचे तुकडे झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या हल्ल्यानंतर, गाडीत प्रवास करणारे 12 पाकिस्तानी सैनिक मृत्युमुखी पडले. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, स्फोटानंतर वाहनाचे तुकडे झाले. पाकिस्तानी लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी लष्कराच्या वाहनावर हल्ला, पहा व्हिडिओ – 

हेही वाचा – Operation Sindoor: सॅटेलाइट फोटोने उघड केलं पाकिस्तानचं विध्वंसित रूप

लाहोरमध्ये स्फोट – 

याशिवाय, गुरुवारी पाकिस्तानातील लाहोरमधून अनेक स्फोटांच्या बातम्या येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे स्फोट लाहोर विमानतळाजवळ झाले. पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण परिसर सील केला आहे आणि परिसरात सायरनचा आवाज ऐकू येत आहे. पाकिस्तानच्या स्थानिक जिओ न्यूजने या स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा – Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल जगभरातून काय प्रतिक्रिया उमटल्या?

ऑपरेशन सिंदूर – 

दरम्यान, भारताने 06-07 मे च्या रात्री पाकिस्तानवर हवाई हल्ले केले होते. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. यामध्ये अनेक दहशतवादीही मारले गेले. भारताने या हल्ल्याचे वर्णन पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला असे केले होते. भारताच्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आले आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number