Violence In Bangladesh: बांगलादेशामध्ये कायदा-सुव्यवस्था कोलमडली; हादीच्या मृत्यूनंतर हिंसक उद्रेक

संतप्त जमावाने द डेली स्टार आणि प्रोथोम आलो या माध्यम संस्थांवर हल्ले करत जाळपोळ केली असून, देशातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Violence In Bangladesh: बांगलादेशामध्ये कायदा-सुव्यवस्था कोलमडली; हादीच्या मृत्यूनंतर हिंसक उद्रेक

बांग्लादेशात कट्टरपंथी संघटना इंकलाब मंच (Inqilab Manch) चे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर देशातील वातावरण तणावपूर्ण झाले असून राजधानी ढाकासह अनेक भागांत हिंसक घटनांचा भडका उडाला आहे. सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सिंगापूरमधील रुग्णालयात हादी याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने काही प्रमुख माध्यम संस्थांवर हल्ले करत आगजनी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
 
हादी याच्या मृत्यूची अधिकृत माहिती गुरुवारी रात्री बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी राष्ट्राला संबोधित करताना दिली. त्याचवेळी इंकलाब मंचच्या अधिकृत फेसबुक पेजवरूनही हादी याच्या निधनाची पुष्टी करण्यात आली. ही माहिती सरकारी वृत्तसंस्था बीएसएस (BSS) च्या अहवालात देण्यात आली आहे.
 
फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीत ढाका-8 मतदारसंघातून संभाव्य अपक्ष उमेदवार असलेल्या हादी याच्यावर 12 डिसेंबर रोजी ढाकामधील बिजोयनगर (Bijoynagar) परिसरात गोळीबार करण्यात आला होता. रिक्शातून जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर जवळून गोळ्या झाडल्या, ज्यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर त्याला प्रथम ढाकामधील एव्हरकेअर हॉस्पिटल (Evercare Hospital) येथे दाखल करण्यात आले आणि नंतर सिंगापूरला हलवण्यात आले.

हेही वाचा: Tapovan Tree Cutting: न्यायालयाचा मोठा निर्णय, तपोवन वृक्षतोडीवर सरकारला दणका, बजावली नोटीस

 
हादी याच्या मृत्यूची बातमी समोर येताच काही तासांतच ढाकामधील कारवां बाजार (Karwan Bazar) परिसरात मोठा हिंसाचार झाला. संतप्त जमावाने प्रसिद्ध बांग्लादेशी वृत्तपत्र द डेली स्टार (The Daily Star) च्या इमारतीला आग लावली. आग आटोक्यात आणण्यासाठी सहा अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल करण्यात आल्या. या घटनेदरम्यान काही पत्रकार आणि कर्मचारी इमारतीत अडकले होते, त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बांग्लादेशी लष्कराला तैनात करण्यात आले.
 
याचदरम्यान, शाहबाग परिसरातून कारवां बाजारच्या दिशेने निघालेल्या जमावाने आणखी एक मोठे माध्यम संस्थान प्रोथोम आलो (Prothom Alo) या कार्यालयाला घेराव घातला. आंदोलकांनी काठ्या आणि लोखंडी रॉडच्या सहाय्याने तोडफोड करत अनेक काचा फोडल्या. ढाका ट्रिब्यून (Dhaka Tribune) च्या वृत्तानुसार, काही आंदोलक मध्यरात्री कार्यालयात शिरले आणि फर्निचर तसेच महत्त्वाची कागदपत्रे रस्त्यावर फेकून त्यांना आग लावली. तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक पत्रकार आणि कर्मचारी अद्याप कार्यालयात अडकले असल्याचे सांगण्यात येते.
 
दरम्यान, नॅशनल सिटिझन पार्टी (National Citizen Party, NCP) च्या विद्यार्थी संघटना जातीय छात्र शक्ति (Jatiya Chhatra Shakti) यांनी ढाकामध्ये तीव्र निदर्शने केली. आंदोलकांनी अंतरिम सरकारचे गृह सल्लागार जहांगीर आलम चौधरी (Jahangir Alam Chowdhury) यांचा पुतळा जाळत, हादी याच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक करण्यात अपयश आल्याचा आरोप केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. युनूस याच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात हिंसाचार वाढल्याने बांग्लादेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनत चालल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.

हेही वाचा: Mira Bhayender Leopard Attack : मुंबईतील मीरा भाईंदरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; 3 जण जखमी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number